देव तारी त्याला कोण मारी! पहा ट्रेनच्या धडकेत जेसीबी चालक कसा वाचला; व्हिडीओ व्हायरल

तुम्ही कधी ट्रेनचा (Train) अपघात पाहिला आहे का? ट्रेनचा अपघात (Train Accidents) हा अत्यंत भीषण असा असतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायर होत आहे.

देव तारी त्याला कोण मारी! पहा ट्रेनच्या धडकेत जेसीबी चालक कसा वाचला; व्हिडीओ व्हायरल
जेसीबी ट्रेन अपघात
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:51 PM

Viral video : तुम्ही कधी ट्रेनचा (Train) अपघात पाहिला आहे का? ट्रेनचा अपघात (Train Accidents) हा अत्यंत भीषण असा असतो. ट्रेनच्या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ट्रेन जेव्हा पटरीवरून धावते तेव्हा ती अत्यंत वेगात असते. तीला थांबवने किंवा लगेच ब्रेक लागणे शक्य नसते, अशावेळेस ट्रॅकवर जी वाहने ट्रेनला आडवी येतात ती वाहने चिरडून ट्रेन पुढे धावते. सध्या ट्रेनचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. यामगेचे कारण देखील तसेच आहे. हा व्हिडीओ आहे जेसीबी आणि ट्रेनच्या अपघाताचा. जेसीबीचालकाचे लक्ष नसल्यामुळे ट्रेन आणि जेसीबीचा अपघात होतो. मात्र या भीषण अपघातातून देखील जेसीबी चालक (JCB driver)हा वाचतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. देव तारी त्याला कोणा मारी अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया युझरकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

ट्रेनच्या धडकेनंतर बचावला चालक

व्हायरल झालेल्या व्हिडीयोमध्ये दिसत आहे की, एक जेसीबी रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालला आहे. त्यावेळी समोरून एक ट्रेन येत आहे. ही ट्रेन अत्यंत वेगात येत आहे. मात्र याचदरम्यान जेसीबी चालकाचे समोर लक्ष नसल्याने तो जेसीबी घेऊन पटरीजवळ जातो. मात्र याचदरम्यान ट्रेन आल्याने जेसीबी आणि ट्रेनचा भीषण अपघात होतो. जेसीबी अचानक समोर आल्याने ट्रेन चालकाला देखील ट्रेनचे ब्रेक लावणे शक्य झाले नाही. याचदरम्यान जेसीबी आणि ट्रेनचा भीषण अपघात होतो. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातानंतर देखील जेसीबी चालक सुखरूपपणे बचावतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

1 लाख 71 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिला व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून,  rassmeshi_kota  नावाच्या एका इंस्टाग्राम युझर्सने आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 17 जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 71 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हाजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून, देव तारी त्याला कोण मारी असे हा व्हिडीओ पाहून अनेक जणांनी म्हटले आहे.

अपघाताचा व्हायरल व्हिडीओ

संबंधित बातम्या

VIDEO | रणवीर सिंगच म्हणतो ही तर छोटी दीपिका, ‘रामलीला’तील भन्नाट डायलॉग व्हायरल

Video : मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पाय घसरुन पडला, चक्क डोंगराच्या मधोमध अडकला, 127 Hours सिनेमापेक्षाही भयंकर!

VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.