Video | डोक्यावर फेटा, काळा चस्मा; भाजीवाल्या ‘पांडेजीं’चा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

झारखंडच्या धनाबादमधील रितेश पांडेय यांच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (jharkhand vegetable vendor dance video)

Video | डोक्यावर फेटा, काळा चस्मा; भाजीवाल्या 'पांडेजीं'चा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
पांडेयजी यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:58 PM

रांची : भारत देशात कलाकारांची कमी नाही, असं सर्रास म्हटलं जातं. कोणत्या रस्त्यावर कधी कोणता कलाकार दिसेल काही सांगता येत नाही. आपल्या देशात शेतात राबणारा शेतकरी हा चांगला गायक असू शकतो. तर कधी ऑटोरिक्षा चालक दमदार लावणी सादर करुन सगळ्यांची वाहवा मिळवतो. काहीजण आपल्यातल्या याच कलाकारीचा स्वत:च्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेतात. झारखंडच्या धनाबादमधील पांडेजीसुद्धा अशाच एका कारणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. (Jharkhand vegetable vendor video of dance going viral)

पांडेजी अचानक चर्चेत का?

झारखंड राज्यातील धनाबादमधील चुलबुल पांडे म्हणून ओळख असणारे रितेश पांडेय सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. मुळात त्यांचा भाजपीपालाविक्रीचा व्यवसाय आहे. भाजी विकण्याच्या त्यांच्या खास शैलीमुळे ते सध्या चर्चेचा विषय बनलेयत. भाजी विकताना गाण्यावर ते चक्क डान्स करतात. डान्स करुन ते ग्राहकांना आकर्षित करतात. त्यांच्या डान्स करण्याची शैलीसुद्धा अगदीच युनिक आहे. डोक्यावर फेटा, डोळ्यावर चस्मा आणि भरदार मिशा असलेले रितेश पांडेय हे याच कारणामुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहेत. डान्स करत भाजी विकण्याचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पांडेयजींचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे :

डोक्यावर फेटा, डोळ्यावर काळा चस्मा घालत डान्स

धनबाद येथील हिरापूर कॉलिनिमध्ये पांडेयजी भाजीपाला विकतात. रोज सकाळी उठून रात्री दहा वाजेपर्यंत ते आपला व्यवसाय करतात. यावेळी संपूर्ण दिवसभर त्यांचा उत्साह कायम असतो. जेव्हा भाजीपाला विकण्यासाठी ते ग्राहाकांना बोलवतात; तेव्हा ते खास शैली वापरतात. डोक्यावर फेटा आणि डोळ्यावर काळा चस्मा लावून ते ग्राहकांना साद घालतात. तसेच, वेगवेगळ्या गाण्यांवर ते जबरदस्त डान्ससुद्धा करतात. भाजीपाला विकण्यासाठी त्यांनी एक स्पेशल गाणेसुद्धा तयार केले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पांडेयजी ज्या ठिकाणी भाजी विकतात, त्याच्या समोर एक पेट्रोल पंप आहे. याच पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या एका महिलेने पांडेजी नाचतानाचा व्हिडीओ शूट केला. या महिलेने हा व्डिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच, नेटकऱ्यांकडून त्याला भरभरुन लाईक्स मिळत आहेत. विशेष म्हणजे पांडेयजींच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्यासुद्धा वाढली आहे.

दरम्यान, भाजी विकताना तुम्ही डान्स का करता?, असं विचारल्यावर ग्राहक आकर्षित व्हावेत तसेच, नागरिकांनी आपल्या कुटुंबियांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा म्हणून मी हे करतो, असे रितेश पांडेय सांगतात. फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांवर हा व्डिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video: तो बाल्कनीतून खाली कोसळला?, अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क, व्हिडीओ व्हायरल

Video | मुलीची करामत, ‘या’ प्रँकमुळे प्रसिद्ध शेफची उडाली तारांबळ, व्हिडीओ व्हायरल

VIDEO | वॉटर सफारीची मजा लुटणारा प्राणी, मनमोहक व्हिडीओने लक्ष वेधलं

(Jharkhand vegetable vendor video of dance going viral)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.