नवव्या वर्षी दहावी, 22 व्या वर्षी IIT बॉम्बेमध्ये प्रोफेसर, मात्र आता या तरुणावर बेरोजगारी का..?
लहानपणापासून सर्व प्रकारचे विक्रम करणारे तथागत अवतार तुळशी सध्या बेरोजगार असून पाटणा (बिहटा) येथे भावाच्या घरी राहतात. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांची नोकरी परत मिळवण्यासाठी त्यांना कायदेशीर मार्ग स्वीकारायचा आहे.
पाटणा : काही काही माणसं करियरच्या बाबतीत प्रचंड हुशार असतात. अशाच एका अवलियाची गोष्ट आज आम्ही तु्म्हाला सांगणार आहोता. वयाच्या 9 व्या वर्षी मॅट्रिक, त्याच्या पुढच्या वर्षी बीएसस्सी, त्यानंतर लगेच एमएस्सी आणि 22 व्या वर्षी थेट आयआयटी बॉम्बेमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरी. अशा वेगवान करिअरचा कोणालाही अभिमान वाटू शकतो, पण बिहारमध्ये राहणारा तथागत अवतार तुलसी सध्या मात्र बेरोजगार आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रकाशझोतात आलेला तथागत अवतार तुलसीला आता फार कमी लोकं भेटतात. त्यांनाही कोणाला भेटण्याची फारशी इच्छा नसते.
कारण लहानपणापासून भौतिकशास्त्राचा सराव करणारे तथागत आजकाल कायद्याच्या पुस्तकात रमला आहे. त्यामुळे भौतिकशास्त्राबरोबरच आपल्या जीवनाचा मार्ग त्याला सुकर करायचा आहे.
तथागत अवतार तुलसीचा जन्म 1987 मध्ये झालेला आहे. 2010 मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावरही तो रुजू झाला होता. मात्र त्यानंतर 2011 मध्ये त्यांना खूप ताप आला, आणि त्याला आरोग्याच्या कोणत्या ना कोणत्या समस्या येत गेल्या. तेव्हापासून तथागत स्वतःला तंदूरस्त समजत नव्हता. तो म्हणतो की, मला समुद्राचाही त्रास होऊ लागला. त्याचा शरीरावर परिणाम होऊन शरी दुखणे अशा तक्रार वाढू लागल्या.
या समस्या चालू असतानाच कसा तरी तो आणखी दोन वर्षे पुढे गेला. पण जेव्हा त्रास वाढू लागला तेव्हा त्याने आयआयटी बॉम्बेमधून चार वर्षांची रजा घेऊन 2013 मध्ये मुंबई सोडली. तेव्हापासून तो पाटण्यात राहतो आहे.
डिसेंबर 2017 मध्ये चार वर्षे पूर्ण झाल्यावर अॅलर्जीमुळे मुंबईला गेलो नाही. त्यातच जुलै 2019 मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तथागत यांचा अर्जही फेटाळला होता.
लहानपणापासून सर्व प्रकारचे विक्रम करणारे तथागत अवतार तुळशी सध्या बेरोजगार असून पाटणा (बिहटा) येथे भावाच्या घरी राहतात. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांची नोकरी परत मिळवण्यासाठी त्यांना कायदेशीर मार्ग स्वीकारायचा आहे. त्यासाठी तो स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहे.
त्यांना ‘व्हर्च्युअल ट्रान्सफर’चा मार्ग सापडला आहे. आता यातून दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी त्याने सुरू केली आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये अर्ज केला असल्याने त्याची बदली दुसऱ्या आयआयटीमध्ये करावी अशी मागणी त्याने केली होती, मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. तब्येतीच्या सततच्या तक्रारीमुळे मात्र त्यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.