या गावात कोणी आपली मुलगी देत नाहीत, लग्नच होत नसल्याने जन्मदर घटला, शाळा पडली ओस
पत्रिकेतील छत्तीस गुण जरी जुळत असले तरी या गावात कोणतीही मुलगी नांदायला जायला राजी होत नाही. या गावात असे काय आहे की कोणीही येथे लग्न करुन राहायला तयार होत नाही. काय आहे हा नेमका प्रकार वाचा

एखाद्या तरुणाचे लग्न होत नसल्याला अनेक कारणे असू शकतात. परंतू एखाद्या गावातच कोणी आपली मुलगी नांदायला पाठवत नसेल तर याला काय म्हणायचे. लग्नाचे छत्तीस गुण जरी मिळाले तरी या गावात आपली मुलगी द्यायला कुठलाही बाप तयार होत नाही. त्यामुळे या गावाचे नाव कुंवारों का गाव ( Village of Bachelors ) असे पडले आहे. काय आहे असे या गावात की कोणतीही मुलगी या गावातील तरुणाशी लग्न करायला तयार होत नाही. तर वाचूयात काय नेमकी भानगड आहे.
केरळातील जोंदालगट्टी गावांत मुलगा लग्नाला आला की आई-बापाला टेन्शन येतं. कारण या गावात कुणाचे लग्नच जमत नाही. कारण मुली या गावाशी आपले नाते जोडण्यासाठी तयार होत नाहीत. थेट नकार देऊन टाकत असतात. तुम्हाला असे वाटत असेल असे या गावात काय आहे की गावात एखादी मुलगी सून म्हणून जाण्यास तयारच होत नाही. तर या मागे या गावाची आर्थिक स्थिती आणि दुर्दशा असे म्हटले जाते बाकी काही खास कारण नाही.
केरळला प्रगत राज्य मानले जात असले तरी या गावात आरोग्य सेवा, रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा आणि आवश्यक यंत्रणा नसल्याने हे गाव दुलर्क्षित खेडे बनले आहे. त्यामुळे येथील वर पसंद करायला वधू तयारच होत नाहीत. सुमारे २०० लोकसंख्येच्या या गावात २० हून अधिक तरुण अनेक वर्षांपासून लग्न करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार नाहीत.
शाळेत केवळ पाच मुले
एका खास ठिकाणी बरीच वर्षे तरुणांचे लग्न न झाल्याने त्या गावातील तरुणाचे वैवाहीक जीवन सुरुच झालेले नाही. या घटनेमुळे येथील शाळेवर देखील परिणाम झाला आहे. येथील शाळेत मुलांची संख्या रोडावली आहे. या वर्षी कोणताही नवीन प्रवेश झालेला नाही. शाळेत केवळ पाच विद्यार्थी आहेत. अंगणवाडी रिकामी आहे. या गावात 41 कुटुंबे राहतात.