मुंबई : उन्हाळा (Summer) सुरू झालाय. अश्यात या तळपत्या उन्हात सगळ्यांनाच आपला प्रवास चांगला आणि शिवाय गारेगार व्हावा अशी इच्छा असते. त्यासाठी मग अनेकजण क्लुप्त्या शोधताना दिसतात. अनेक रिक्षाचालक आपल्या रिक्षा (Auto Driver) आणि अधिकाधिक सोईसुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या अशीच एक रिक्षा सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही रिक्षा पाहून तुम्हालाही या रिक्षातून प्रवास करण्याची इच्छा होईल. ही रिक्षा म्हणजे ‘ओपन एसी’ (Open AC) आहे. कारण चहूबाजूंनी उघडी असणारी ही रिक्षा चालू झाली की तुम्हाला थंडगार हवा मिळेल. शिवाय या रिक्षाच्या टपावरही हिरवळ पसरली आहे. त्यामुळे थंडावा मिळण्यास मदत होईल.
सध्या सोशल मीडियावर एका रिक्षाची जोरदार चर्चा आहे. ही रिक्षा पाहून तुम्हालाही या रिक्षातून प्रवास करण्याची इच्छा होईल. ही रिक्षा म्हणजे ‘ओपन एसी’ आहे. कारण चहूबाजूंनी उघडी असणारी ही रिक्षा चालू झाली की तुम्हाला थंडगार हवा मिळेल. शिवाय या रिक्षाच्या टपावरही हिरवळ पसरली आहे. त्यामुळे थंडावा मिळण्यास मदत होईल.
This Indian ?? man grew grass on his rickshaw to stay cool even in the heat. Pretty cool indeed! pic.twitter.com/YnjLdh2rX2
— Erik Solheim (@ErikSolheim) April 4, 2022
एरिक सोल्हेम या व्यक्तीने ट्विटरवर या रिक्षाचा फोटो शेअर केलाय. “हा भारतीय जुगाड आहे उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी या रिक्षाचालकाने रिक्षावर असं गवत लावलंय. खुपच छान”, असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका यूजरने लिहिलं आहे की, “भारतात खूप टॅलेंट आहे. फरक एवढाच आहे की आपल्यातील कलागुणांना अनेकदा ओळखले जात नाही, या रिक्षा बनवणाऱ्याचं कौतुक!” ” सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय. त्यामुळे असे प्रयोग करणं गरजेचं आहे.आपण असे प्रयोग घरातही करायला हवेत”,असं आणखी एक नेटकऱ्याने म्हटलंय. तर “ही रिक्षा पाहून मला या रिक्षातून प्रवास करावासा वाटतोय”, असं एका नेटकऱ्याने लिहिलंय.
संबंधित बातम्या
‘पिछे देखो पिछे, पिछे तो देखो’ फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?