सायेब…वो सायेब… मला माझ्या बायकोपासून वाचवा हो… लय… पोलीस आयुक्तांसमोर ढसाढसा रडला कापड व्यापारी

UP News : पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या संतप्त पत्नींकडून अनेकदा तक्रारी समोर येतात. पण, कानपूरमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली जेव्हा एका पतीने पोलिस आयुक्त कार्यालय गाठत, साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा, असे सांगितले.

सायेब...वो सायेब... मला माझ्या बायकोपासून वाचवा हो... लय... पोलीस आयुक्तांसमोर ढसाढसा रडला कापड व्यापारी
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:34 AM

कानपूर : पत्नीच्या त्रासापासून सुटका व्हावी अशी मागणी करत एका व्यक्तीने थेट पोलिस आयुक्त कार्यालय (police commisioner office) गाठले. सासरच्या लोकांनी आजार (mental health problem) लपवून लग्न केले आणि पत्नी मनोरुग्ण निघाली, असा आरोप पीडित इसमाने आहे. त्याच्या सांगण्यानुसार, त्या इसमाच्या पत्नीला रोज झटके यायचे आणि घराची तोडफोड करायची, काही वेळेस मारामारीही करत असे. अशा पत्नीपासून आपल्याला वाचवा अशी याचना करत कापड व्यापाऱ्याने पोलिस आयुक्त कार्यालय गाठले.

श्याम नगरचे रहिवासी असलेले कापड व्यापारी शाश्वत गुप्ता यांनी सांगितले की, जून 2021 मध्ये त्यांचा नेताजी नगर येथील रहिवासी प्रियंका गुप्तासोबत विवाह झाला होता. जुलै महिन्यात ते पत्नीसोबत लडाखला भेट देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांची पत्नी प्रियांकाला एका रेस्टॉरंटमध्ये चक्कर आली होती. रेस्टॉरंटमध्येच प्रियांकाने विचित्र कृत्ये केली, त्यानंतर शाश्वत घाबरला.

घरी परत येताच त्याने पत्नी प्रियांकाला तिच्या माहेरच्या घरी सोडले. याबाबत प्रियांकाच्या कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी काहीही सांगितले नाही. काही दिवसांनी प्रियांकाला घरी आणले असता तिला पुन्हा झटके आले आणि तिने पतीला मारहाण केली. यावेळी शाश्वतचा हातही तुटला. काही दिवसांनी पुन्हा घरातील वादातून पत्नी प्रियांकाने आजीचा गळा दाबायचा प्रयत्न केला. असे आरोप करत त्या पीडित इसमाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्याला वाचवण्यात यावे विनंती केली.

कापड व्यावसायिक शाश्वत गुप्ता यांनी सांगितले की, डॉक्टरांना दाखवल्यानंतर तज्ज्ञांनी प्रियांका स्किझोफ्रेनिया नावाचा आजार झाल्याचे सांगितले. या आजारात असे झटके येतात. गुप्ता यांनी सांगितले की, पत्नीला 2 महिन्यांपूर्वी तिच्या घरी सोडण्यात आले होते, तेव्हापासून पत्नीचे कुटुंबीय त्याच्यावर सतत दबाव आणत आहेत आणि त्याला एखाद्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ​​आहेत.

या संपूर्ण प्रकरणात स्टेशन प्रभारी चकेरी यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून तहरीर प्राप्त झाला आहे. कौटुंबिक प्रकरण पाहून ते समुपदेशकाकडे पाठवले जाईल. मात्र, कधी-कधी अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये योग्य आणि अयोग्य ठरवणे फार कठीण होऊन बसते. ही परिस्थिती ना पोलिसांना लागू आहे ना न्यायालयांना.

'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.