आईच्या मोबाईलमध्ये आमच्या आठवणी, प्लीज परत द्या, माय गमवलेल्या लेकीचं आर्त पत्र

आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची विनंती 9 वर्षांच्या हृतिक्षाने प्रशासनाला केली आहे. (Karnataka Hrithiksha letter Mother's Mobile)

आईच्या मोबाईलमध्ये आमच्या आठवणी, प्लीज परत द्या, माय गमवलेल्या लेकीचं आर्त पत्र
हृतिक्षाचे पत्र व्हायरल
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:33 AM

बंगळुरु : कोरोनामुळे आईला गमावल्यानंतर आता तिच्या आठवणीही आपल्याकडून हिरावल्या जाऊ नयेत, यासाठी नऊ वर्षांच्या चिमुरडीची धडपड सुरु आहे. माझ्या आईच्या मोबाईलमध्ये आमच्या खूप आठवणी आहेत, कोणाला तो सापडला असेल तर प्लीज परत द्या, अशी आर्त हाक तिने पत्रातून घातली आहे. कर्नाटकच्या कोडागू गावातील या चिमुकलीचं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या बालिकेती साद ऐकून भल्याभल्यांचे डोळे पाणावले. (Karnataka Madikeri 9 Years old Hrithiksha writes letter requesting to return her Dead Mother’s Mobile goes Viral on Social Media)

आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची विनंती 9 वर्षांच्या हृतिक्षाने प्रशासनाला केली आहे. स्थानिक पोलीस उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोव्हिड रुग्णालयाला तिने एक पत्र लिहिले आहे. हृतिक्षाच्या आईचा 16 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तिची रवानगी अनाथालयात झाली. मात्र या काळात आईचा मोबाईल गहाळ झाल्यामुळे हृतिक्षाला चिंता लागली आहे.

पत्रात काय लिहिलंय?

“माझे वडील रोजंदारीवर काम करतात. माझ्या आईचे 16 मे रोजी कोरोनाने निधन झाले. आईचा मोबाईल कोणीतरी घेतला आहे. आईला गमावल्याने मी आधीच पोरकी झाले आहे. आईच्या मोबाईलमध्ये आमच्या बर्‍याच आठवणी आहेत. ज्यांनी तो फोन घेतला असेल किंवा कोणाला जर तो सापडला असेल, त्यांना विनंती आहे की मोबाई माझ्या अनाथाश्रमात आणून द्या” अशी आर्त साद हृतिक्षाने पत्रातून घातली आहे.

हृतिक्षाचे वडील काय म्हणतात?

“माझी पत्नी टी के प्रभाने नुकताच अखेरचा श्वास घेतला. तिचं सामान आम्हाला मिळालं, मात्र तिचा मोबाईल सापडलेला नाही. आम्ही तिच्या नंबरवर बर्‍याच वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद आहे. आईचा मोबाईल न मिळाल्याने हृतिक्षाच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे. आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये साठवलेल्या आहेत. आईच्या फोनवरुन हृतिक्षा ऑनलाईन शिक्षणही घेत होती. नवीन फोन खरेदी करणे मला शक्य नाही. तरी आम्हाला तिच्या आईचाच फोन परत हवा आहे.” असं हृतिक्षाचे वडील नवीन कुमार यांनी सांगितलं. (Karnataka Hrithiksha letter Mother’s Mobile)

संबंधित बातम्या :

‘आई काळजी करु नको, तू लवकर बरी होणार, तुला घरी घेऊन जाऊ’, रुग्णालयातील महिलेला मुलांचं भावनिक पत्र

वऱ्हाड निघालं लग्नाला, 161 वऱ्हाडी घेऊन विमान झेपावलं, विमानातच वधू-वर लग्नबेडीत, तामिळनाडूतील अनोखं लग्न

(Karnataka Madikeri 9 Years old Hrithiksha writes letter requesting to return her Dead Mother’s Mobile goes Viral on Social Media)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.