Viral Video : ‘या’ आजीचं इंग्रजीचं कौशल्य पाहा, खास शैलीचं यूझर्स करतायत कौतुक
Grandma Speaking English Video : एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये काश्मिरी (Kashmiri) वृद्ध महिला तिच्या नव्याने आत्मसात केलेले इंग्रजी कौशल्य दाखवताना दिसत आहे.
Grandma Speaking English Video : इंटरनेटच्या विश्वात कधी काय व्हायरल होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. अनेक वेळा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मजा येते, तर काहीवेळा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला दिवस मजेत जातो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये काश्मिरी (Kashmiri) वृद्ध महिला तिच्या नव्याने आत्मसात केलेले इंग्रजी कौशल्य दाखवताना दिसत आहे. 36 सेकंदाच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिची खास शैली लोकांना खूप आवडत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुण काही फळे, भाज्या आणि प्राण्यांची नावे काश्मिरी भाषेत बोलत आहे आणि पारंपरिक पोशाखात बसलेल्या एक वृद्ध महिलेला इंग्रजीत ओळखण्यास सांगत आहे. जरी ती सुरुवातीला “मांजर” ओळखताना अडखळते, परंतु नंतर ती त्याला मांजर म्हणून ओळखते. यानंतर, ती कांदा, सफरचंद, लसूण आणि कुत्रा यांनाही ओळखते.
ट्विटरवर शेअर
36 सेकंदांचा हा व्हिडिओ सय्यद एस शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटर व्यतिरिक्त, जे व्हाट्सअॅप आणि फेसबुकसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
आजीचे कौतुक
सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. यामुळेच अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने सांगितले, की आजीची ही स्टाइल खरोखरच आगळीच आहे. दुसर्या यूझरने लिहिले, की मी या वर्षी पाहिलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे, अद्भुत!. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.
The circle of life ! ? They taught us how to talk when we were babies and how the turntables ! What is even more wholesome is that learning is a consistent process in life ! ? pic.twitter.com/NxQ7EHjAwZ
— Syed Sleet Shah (@Sleet_Shah) February 14, 2022
आणखी वाचा :