IAS officer dance : केरळच्या महिला आयएएस ऑफिसरचा ‘नगाड़ा संग ढोल..’ विद्यार्थ्यांसोबत धरला ठेका… Video viral

IAS officer dance : एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले.

IAS officer dance : केरळच्या महिला आयएएस ऑफिसरचा 'नगाड़ा संग ढोल..' विद्यार्थ्यांसोबत धरला ठेका... Video viral
विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 12:40 PM

IAS officer dance : आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या फ्लॅश मॉबमध्ये भाग घेतला होता. तिथे विद्यार्थ्यांनी डान्स सुरू करताच डॉ. दिव्या यांनीही डान्स सुरू केला. त्यांचा धमाकेदार डान्स पाहून सगळेच थक्क झाले. हा व्हिडिओ एमजी विद्यापीठाचा आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. दिव्या ‘नगाड़ा संग ढोल..’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत विद्यार्थीही नाचत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांनी सांगितले, की इथे डान्स करून कॉलेजचा युवा महोत्सव आठवला.

ग्रुप डान्स

आयएएस दिव्या म्हणाल्या, की जेव्हा त्या डान्स करत होत्या, तेव्हा त्यांची मुले आणि पतीही तिथे उपस्थित होते. त्यांनाही हा डान्स खूप आवडला. अनिरुद्धही एक विद्यार्थी आहे, तोही या फ्लॅश मॉबमध्ये सहभागी झाला होता. तो सांगतो, की जेव्हा डॉ. दिव्या यांनी त्यांच्यासोबत आणि त्यांच्या ग्रुपसोबत डान्स केला, तेव्हा प्रत्येकजण खूप प्रेरित झाला होता.

विद्यार्थ्यांनी केला होता आग्रह

स्थानिक बातम्यांनुसार, अय्यर ‘दीपकळ्ळा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. तिथे विद्यार्थ्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्या नृत्यात सामील झाल्या. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोक त्यांचे चाहते झाले आणि त्यांनी आयएएस दिव्या यांच्या या साधेपणाचे कौतुकही केले.

आणकी वाचा :

एकट्या सिंहिणीवर तुटून पडतो तरसांचा कळप, पण नंतर घडतं भलतंच; Wild video viral

…अखेर गळाला लागलाच! मासे पकडण्यासाठी काय अफलातून युक्ती केलीय चिमुरड्यानं! ‘हा’ Jugaad video पाहाच

Chinese robotic dog : भयाण शांतता… रस्त्यावर चिटपाखरुही नाही, अशा निर्मनुष्य रस्त्यांवर काय करतोय ‘हा’ कुत्रा?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.