Superpower of man : सोशल मीडियावरचे (Social Media) व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. त्यातल्या वेगळेपणामुळे ते चर्चेत असतात. आता एक वेगळा व्हिडिओ (Video) चर्चेत आला आहे. एक अद्भुत असा हा कलाकार आहे. एक ताकदवान, शक्तीशाली अशा या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. आपल्याला विनोदी, लहान मुलांचे, डान्सचे तसेच माहितीपर व्हिडिओ आवडत असतात. आपण ते शेअरही करत असतो. आताचा व्हिडिओ हा अत्यंत अद्भूत असाच म्हणावा लागेल. त्याच्यातील अनोख्या गुणांमुळेच तो व्हायरल होत आहे. यूझर्सकडून सर्वाधिक पसंती या व्हिडिओला मिळत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल. दक्षिण भारतातल्या केरळमधल्या (Kerala) व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. तो जे काही आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्यामुळे आपल्यालाही विचार करायला भाग पाडतं.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
केरळच्या 38 वर्षाच्या अभिषचा हा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मोठमोठे दगड उचलतो आहे. कमी वेळात नारळ हाताच्या फटक्यानं फोडत आहे. त्याबरोबरच टरबूज आणि इतर अनेक फळं आपल्या ताकदीनं एका फटक्यात फोडत आहे. हा व्यक्ती त्यावेळी अधिक प्रसिद्ध झाला, ज्यावेळी त्यानं केवळ 60 सेकंदांत 122 नारळ फोडले. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे. या विक्रमासह त्याचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर हा व्हिडिओ फॅक्ट्स गुरू (Facts Guru) नावाच्या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 7.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात सातत्यानं वाढच होत आहे. ‘ऐसे गजब के Talent भारत में ही मिलते हैं।’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून ते लाइक आणि कमेंट्स करत आहेत. (Video Courtesy – Facts Guru)
आणखी वाचा :