Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

व्हिडीओमध्ये वाघ आणि वाघीण हे भर रस्त्यावर आरामात चालताना दिसत आहेत. (tiger viral video)

Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्
viral video
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 3:18 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. या व्हिडीओंचा चाहता वर्ग जास्त असल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाघ आणि त्याची वाघीण हे भर रस्त्यावर आरामात चालताना दिसत आहेत. या दोघांना लोकांची कोणतीही भीती नसल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे. (king lion moving fearlessly on road video goes viral on social media)

वाघाला पाहून लोकांचा लपंडाव

या व्हिडिओमध्ये एक वाघ आणि एक वाघीण रस्त्यावरुन चालताना दिसतायत. ते सध्या शिकार करण्याच्या मुडमध्ये नसावेत. म्हणूनच की काय ते बाजूला तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत नाहीयेत. ते डांबरी रस्त्यावरुन मोठ्या दिमाखात चालत आहेत.

प्रवाशीही बिनधास्त, कसलीही भीती नाही

या व्हिडीओमध्ये वाघ आणि वाघीण कोणालाही भीत नसल्याचं दिसतंय. ते अगदी बेफिकीरपणे तसेच बिनधास्त रस्त्याने चालताना दिसत आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूने लोकांनी आपली वाहने थांबवली आहेत. मात्र, एवढ्या साऱ्या गर्दीला पाहून वाघ आणि वाघीण थोडेसुद्धा विचलित झालेले नाहीयेत. ते मजेत इकडून तिकडे रस्त्यावर फिरतायत. या दोघांच्याही बिनधास्तपणाचीच चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.

या व्हिडीओला सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच अनेकांनी राजा-राणी एकदम बिनधास्त असल्याचा दावा केला आहे. सध्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांना व्हिडीओ आवडला

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या वॉलवर शेअर केला आहे. या व्हिडीओची दखल आएएस अधिकारी सुशांत नंदा यांनी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या पर्सनल ट्विटर अकाऊंटला वाघ आणि वाघीण यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलेच पसंद केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच

Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल

Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु

(king lion moving fearlessly on road video goes viral on social media)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.