‘काय करु? दारु सुटतच नाही!’ हीच तुमचीही समस्या? सगळ्यात आधी मानसिकता बदला

| Updated on: Dec 24, 2021 | 7:37 PM

अनेकदा ठरवूनही लोकांना दारु पिण्याची सवय सुटता सुटत नाही. अशावेळी नेमकं काय करावं, अशा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यावेळी महत्त्वाचे चार उपाय करणं फायदेशीर ठरु शकतं.

1 / 6
दारु वाईटच! अतिप्रमाणात दारुचं सेवन करणं, ते तर त्याहीपेक्षा वाईट. अशावेळी दारु पिण्याची सवय लागून जाणं, व्यसन बनणं, हे घातकच असतं. दारुचं व्यसन लागल्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन हे व्यसन सोडवण्यासाठी काम करणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा ठरवूनही लोकांना दारु पिण्याची सवय सुटता सुटत नाही. अशावेळी नेमकं काय करावं, अशा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यावेळी महत्त्वाचे चार उपाय करणं फायदेशीर ठरु शकतं. अमेरीकेतल्या एका व्यसनमुक्तीकेंद्रानं केलेल्या अभ्यासात मानसिकता ही व्यसन सोडवण्यासाठीची प्राथमिक गोष्ट असल्याचं समोर आलंय.

2 / 6
स्वतःच स्वतःला फसवू नका! हे सगळ्यात पहिलं धोरण दारु सोडवताना अवलंबलं पाहिजे. स्वतःची फसवणूक करणं एकदा थांबवलं की मग इतरांची भीती संपून जाते. त्यामुळए एकदा स्वतः स्वतःला वचन देणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते. जसं लोक ठरवून गोड खाणं टाळतात, जंक फूड खाणं टाळतात, तसंच तुम्हालाही ठरवून टाकावं लागेल. हो.. मी मनाशी पक्क पक्क केलंय, की नाही पिणार, हे निश्चित केलं आणि स्वतःलाच वचन दिलं, की दारु सुटण्यासाठीचं मोठं दडपड सहज दूर होईल. त्यासाठीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे.

3 / 6
‘काय करु? दारु सुटतच नाही!’ हीच तुमचीही समस्या? सगळ्यात आधी मानसिकता बदला

4 / 6
अनेकदा काही गोष्टी लगेच सुटत नाहीतच. दारुही त्यापैकी एक आहे. त्यामुळे अशावेळी स्वतःच स्वतःला काही बंधनं घालू घेणं महत्त्वाचं आहे. बंधन घालायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर दारु पिण्यासाठीचे काही नियम स्वतःला घालून द्यायचे. दारु पिण्याच्या वेळा, दारु पिण्याचं प्रमाण, दारु पिण्याचे दिवस, अशा गोष्टी नियम तयार करताना आपण आपल्या मनात ठरवून घेतल्या ही दारु सोडणं, सोप्प होईल. किंवा आपल्याला दारुचं व्यसन लागलेलं आह, याची जाणीव या नियमांनीच कमी होऊन झाली. हळूहळू पूर्णपणे तुम्हाला दारुची तलप लागणार नाही.

5 / 6
मन मोकळं केल्यांनं दडपण कमी होतं. ताण हलका होतो. या गोष्टी खऱ्या आहेत, हे तुम्हाला केल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही दारु नेमकी कशासाठी पिता? त्याची कारणं नेमकी काय आहेत? नाही प्यायलात तर काय होईल? या सगळ्याबाबत कुणाशीतरी हक्कानं बोलावं. एखाद्या हक्काच्या व्यक्तिकडे आपल्या मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं. जो वेळ तुम्ही दारु पिण्यात खर्च करताय, तोच वेळ सत्करीही लागू शकतो, याचा शोधही कदाचित तुम्हाला याच बोलण्यातून, मन हलकं करण्यासाठी आणि व्यक्त होण्याची मिळू शकेल.

6 / 6