VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी

नगराध्यक्ष जानवेकर यांनी त्या ग्रामस्थाच्या कानाखाली आवाज काढल्याने त्या व्यक्तीनेही नगराध्यक्षांची कॉलर पकडून हाणामारी केली (Kolhapur Hatkanangale Nagaradhyaksha Fight Video)

VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी
ट्राफिक जॅममुळे वाद झाल्यानंतर ग्रामस्थाची नगराध्यक्षांशी हाणामारी
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 3:57 PM

इचलकरंजी : कोल्हापुरात हातकणंगले नगरपंचायतीच्या दारात वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने नगराध्यक्ष आणि एका नागरिकामध्ये हाणामारी झाली. यामुळे हातकणंगलेसह परिसरात खळबळ उडाली. दोघांनी पोलीस ठाणेही गाठले, मात्र पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणल्याने तक्रार दाखल झाली नाही. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kolhapur Hatkanangale Nagar Panchayat Nagaradhyaksha Fight with man over traffic jam Video goes viral)

अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाद

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायतीच्या दारातील मुख्य रस्ता अरुंद आहे. याच रस्त्यावर बाजारपेठ असल्याने दुकानांची संख्या भरपूर आहे. रविवारी दुपारी दुकानात माल उतरवण्यासाठी एक टेम्पो रस्त्यातच थांबला होता. त्यातच नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांची चारचाकी गाडीही तिथेच होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

ग्रामस्थ नगराध्यक्षांना भिडला

दरम्यान एका संतापलेल्या ग्रामस्थाने नगरपंचायतीने वाहतुकीची शिस्त का लावली नाही, असा सवाल नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांना केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. नगराध्यक्ष जानवेकर यांनी त्या ग्रामस्थाच्या कानाखाली आवाज काढल्याने त्या व्यक्तीनेही नगराध्यक्षांची कॉलर पकडून हाणामारी केली. दोघातही झोंबाझोंबी झाली.

पोलीस स्थानकात दोघांमध्ये समेट

तात्काळ इतर ग्रामस्थांनी दोघांनाही बाजूला केले. त्यानंतर दोघांनीही हातकणंगले पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पण दोघांनाही कोठडीची हवा खायला लागेल, असा दम मिळाल्याने दोघेही आपापसात समझोता करुन तक्रार न देताच माघारी फिरले. (Kolhapur Hatkanangale Nagaradhyaksha Fight Video)

या दोघातील हाणामारी चक्क चौकात झाल्याने, अन त्यात खुद्द नगराध्यक्ष असल्यान मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे हातकणंगलेसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पण या प्रकारानंतरही वाहतुकीची कोंडी सुटणार का? हा प्रश्न अनुत्तरितत राहिला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO : एपीएमसी मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी, क्षुल्लक कारणामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण

(Kolhapur Hatkanangale Nagar Panchayat Nagaradhyaksha Fight with man over traffic jam Video goes viral)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.