Kolhapur : कोल्हापूरकरांना वाटलं एलियन आले, आकाशात तबकडी दिसली, मात्र दिसलं ते पाहून…
पांढर्या शुभ्र रंगाची तबकडी (Tabakdi) सारखी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकली. आणि हे नेमकं काय याचा सस्पेन्स आणखी वाढला.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं कुठल्याच गोष्टीला कमी नसेत, मग त्या कोल्हापूरच्या तालमी असो, तांबडा पांढरा असो, किंवा ऊसाच्या फडापासून तमाशाच्या फडापर्यंत काहीही असो, मात्र याच कोल्हापुरात एलियन (Aliens) उतरत आहेत की काय असाच भास कोल्हापूरकरांना काही काळ झाला. त्याला कारणही तसेच ठरले, आकाशात अचानक एक अशी वस्तू दिसली. त्यामुळे अनेकांना एलियनचे अनेक चित्रपट डोळ्यासमोर उभे राहिले. कोल्हापुरात काल आकाशात तहकडी सदृष्य वस्तू दिसल्याने ही वस्तू नेमकी काय याची बरीच चर्चाही रंगली. पांढर्या शुभ्र रंगाची तबकडी (Tabakdi) सारखी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकली. आणि हे नेमकं काय याचा सस्पेन्स आणखी वाढला.
आकाशात दिसलेल्या वस्तुचा व्हिडिओ
व्हिडिओ पाहून सस्पेन्स वाढला
आता ही वस्तू पाहून हे काय दिसतंय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पन्हाळा येथील रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये याचं शूटिंग केलं, अतिशय मंद गतीने तबकडी सारखी ही वस्तू उत्तरेच्या दिशेला सरकत होती, असेही त्यांनी सांगितलं. त्याने तर लोकांच्या मनातला संशय कल्लोळ आणखी वाढला. मात्र काही काळातच हवामान खात्यानं हा संशयकल्लोळ संपवला. आणि हे नेमकं काय आहे. याचा सस्पेन्स संपला. त्यानंतर मात्र कोल्हापूरकच चकित राहिले.
ही वस्तू नेमकी काय निघाली?
ही वस्तू नेमकी काय आहे? याबाबत जास्त चौकशी केल्यावर अशी माहिती समोर आली की गोवा हमान खात्यानं हवामानाचा अंदाज घेण्यासाठी काही बलून आकाशात सोडले होते. हेच बलून सरकत सरकत पन्हाळ्यापर्यंत आले होते. मात्र काही काळ तरी या गोष्टीने कोल्हापूरकरांना चांगलेच संभ्रमात टाकले होते. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यासाठी मान्सूनचा अंदाज घेण्याचा प्रयत्न रोज हवामान खात्याकडून होत आहे. मात्र हाच प्रयत्न काही काळ कोल्हापुरात एलियन येतात की काय असे भासवून गेला एवढं मात्र नक्की.