‘भावा, लोकांना आवडत नसताना तू हे सर्व का करतोस?’ असं का म्हणतायत लोक? आधी ‘हा’ Viral video पाहा

Weird food combinations : रस्त्यावर विक्रेत्यांमध्ये विचित्र खाद्य पदार्थ तयार करण्याची चढाओढ लागली आहे. व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओमध्ये मिल्कशेकच्या (Milkshake) नावाने लाडूंवर अत्याचार केले. मोतीचूर लाडूंचा (Ladu) मिल्कशेक बनवला आहे

'भावा, लोकांना आवडत नसताना तू हे सर्व का करतोस?' असं का म्हणतायत लोक? आधी 'हा' Viral video पाहा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली लाडू मिल्कशेक रेसिपीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:50 PM

Weird food combinations : रस्त्यावर विक्रेत्यांमध्ये विचित्र खाद्य पदार्थ तयार करण्याची चढाओढ लागली आहे, की काय असे आपल्याला वाटू शकते. कारण सोशल मीडियावर नेहमीच असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचे प्रमाणही वाढले आहे. कधी दाक्षिणात्य डोसा या पदार्थापासून आईस्क्रीम रोल बनवतात, कधी पाणीपुरीत मॅगी टाकून लोकांना सर्व्ह करतात. तर कधी चाळीस अंड्यांपासून ऑम्लेट बनवतात. पण सध्या व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला असे पदार्थ खायचे की नाही, हा प्रश्न पडू शकतो. मिल्कशेकच्या (Milkshake) नावाने लाडूंवर केलेले अत्याचार पाहून तुम्हालाही संताप येईल. या व्यक्तीने मोतीचूर लाडूंसोबत (Ladu) मिल्कशेक बनवला आहे, ज्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एका यूझरने संताप व्यक्त केला आहे आणि ‘आता मॅगी, समोसा, पिझ्झा, कचोरी… या सगळ्यांसोबत मिल्कशेक बनव भावा.’

…लाडूशौकिनांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाहावे

जर तुम्हीही मोतीचूर लाडू खाण्याचे शौकीन असाल तर हा व्हायरल व्हिडिओ तुमच्या जबाबदारीवर पाहा. कारण एका व्यक्तीने लाडूंवर प्रयोग करून त्याला असे काही बनवले आहे, की तुम्ही सहन करू शकणार नाहीत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विक्रेता प्रथम बेसन आणि मोतीचूर लाडू मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यात टाकतो. यानंतर त्यात दूध, साखर आणि मलई घालून मिक्स करतो. यानंतर तयार होतो लाडू मिल्कशेक… हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाडू आणि मिल्कशेकप्रेमी दोघांनाही धक्का बसला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

या विचित्र फूड कॉम्बिनेशन रेसिपीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर foodie_blest या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, प्रयोग कसा होता? या प्रयोगानंतर लाडू आणि मिल्कशेकप्रेमी या दुकानदाराला शिव्यांची लाखोलीच वाहत आहेत.

‘नरकातही जागा मिळणार नाही’

या गुन्ह्यासाठी तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही, असे एका यूझरने गंमतीने म्हटले आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. दुसरा यूझर म्हणतो, की भावा, लोकांना हे आवडत नसताना तू हे सर्व का करतोस? एकूणच मोतीचूर लाडूसोबतचा मिल्कशेक लोकांना अजिबात आवडलेला नाही.

आणखी वाचा :

‘मैं कॉफी पिती हूँ क्या पागल, नही चाहिए जा..!’ पण पुढे काय होतं? धमाल Video पाहा…

Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय? पाहा, ‘ताडोबा’तला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग

Creative wood craft : प्रत्येकाकडे त्याचं सर्वोत्तम असतं, जे तो वेळ आल्यावर देतो..! Video viral

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.