#LataMangeshkar : लता मंगेशकरांच्या आठवणी आणि शोकसागरात बुडाला Social Media, ‘या’ गाण्यांतून वाहिली जातेय श्रद्धांजली
Lata Mangeshkar Nidhan : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधना(Death)मुळे आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सोशल मीडिया(Social Media)वर लोक आपापल्या पद्धतीनं शोक व्यक्त करत आहेत. सदाबहार गाणी शेअर करत आहेत.
Lata Mangeshkar Nidhan : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधना(Death)मुळे आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सोशल मीडिया(Social Media)वर लोक आपापल्या पद्धतीनं शोक व्यक्त करत आहेत. काहीजण त्यांच्या अनेक दशकांच्या गाण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलत आहेत, तर काहीजण त्यांची अनोखी आणि सदाबहार गाणी आठवत आहेत. जर आपण त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्यांनी सुमारे 70 वर्षे बॉलिवूड(Bollywood)मध्ये गायन केलं आणि आपल्या सुंदर आवाजानं लोकांच्या हृदयात, मनात स्थान निर्माण केलं. 40च्या दशकात सुरू झालेला गायनाचा प्रवास आता कायमचा थांबला आहे. तर साधारणपणे 2010पर्यंत त्यांनी बॉलिवूडला हजारो सदाबहार गाणी दिली. ही गाणी तरुणाईच्याही हृदयात कायमच घर करून आहेत. सदाबहार असं त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, ते उगीच नाही, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’
लता मंगेशकरांची काही गाणी आहेत, जी नवीन पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. लोकांना त्यांना ऐकायला आवडतं. अनेकजण ती गुणगुणतात. यामध्ये ‘लग जा गले’ आणि ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ या गाण्यांचा समावेश आहे. लोक सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांशी संबंधित बरेच व्हिडिओदेखील शेअर करत आहेत आणि त्यांच्या खास शैलीत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
My heartfelt condolences to the family and the entire nation as we lost our nightingale. Your legacy and voice will remain with us and inspire the generations to come! Om Shanti BharatRatna #LataMangeshkar…???@mangeshkarlata #bharatratna #लता_मंगेशकर #RestInPeace #Bollywood pic.twitter.com/K3OzEEQd1P
— Ambuj K Solha (@AmbujSolha) February 6, 2022
‘ए मेरे वतन के लोगों’
लता मंगेशकर यांच्या ‘ए मेरे वतन के लोगों’ या देशभक्तीपर गाण्याबद्दल काय बोलावं? हे एक अजरामर गीत आहे, ज्याचा वेगळा इतिहास आहे. असं म्हणतात, की लता मंगेशकर यांनी हे गाणे पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर सादर केलं तेव्हा ते ऐकून त्यांचे डोळे भरून आले होते. त्यानंतरही त्यांनी अनेक प्रसंगी या गाण्यावर आपला परफॉर्मन्स दिला. त्यांच्या जाण्यानं लोक शोकात तर आहेतच मात्र ही गाणीही शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत. सोशल मीडियावर ही गाणी व्हायरल होत आहे. ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं देशातल्या करोडो नागरिकांच्या भावनांशी निगडीत आहे.
Legendary singer Lata Mangeshkarji will forever live in our hearts. My condolences to her the family. May her soul Rest In Peace Om Shanti
लता मंगेशकर ?#LataMangeshkar pic.twitter.com/GgprFBSM1m
— Team Umar Riaz Official ? (@AsimsquadNick) February 6, 2022
याशिवाय लता मंगेशकर यांची अशी अनेक गाणी आहेत, जी लोकांना खूप आवडतात आणि लोक त्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.