मुंबई : जेवण तयार करण्याचा सिलेंडर (Jugaad Video) अनेकदा घरी असलेल्या महिला उचलतं नाही. जोपर्यंत घरातील पुरुष येत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. सिलेंडर (viral video) उचलण्यासाठी मेहनत करावी लागते. काही लोक सिलेंडर आडवा करुन ढकलत घरापर्यंत घेऊन जातात. त्याचबरोबर काही महिला घरात किचनमध्ये गोल गोल फिरवत सिलेंडर (trending video) घेऊन जातात. सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी ठेवत असताना अनेकजण जखमी झाले आहे. काहीजण पडले सुध्दा आहेत. परंतु एका व्यक्तीने त्यावर एक उपाय शोधून काढला आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला सुध्दा आहे. आता तुम्हाला एक सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी अजिबात मेहनत करावी लागणार नाही. एका व्यक्तीने लोखंडी पाईपच्या माध्यमातून एक छोटीशी ट्रॉली तयार केली आहे. तरुण आणि वयोवृध्द लोकं ती ट्रॉली वापरु शकतात. तुम्ही तो व्हायरल झालेला व्हिडीओ पाहत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की ती व्यक्ती कशापद्धतीने काम करीत आहे. अनेकांनी त्या व्हिडीओला कमेंट सुध्दा केल्या आहेत.
सध्याचा व्हायरल व्हिडीओ agrwalpravesh नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्हिडीओला अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर लोकं त्याच्या जुगाडाचं कौतुक देखील करीत आहेत. त्या व्हिडीओला आतापर्यंत दोन करोड लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर अनोखा जुगाड पाहून वेगवेगळ्या कमेंट सुध्दा आल्या आहेत.
एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, बाकी सगळं ठिक आहे, परंतु दुसऱ्या माळ्यावर सिलेंडर कसा घेऊन जायचा. दुसरा नेटकरी म्हणतो, वर्षातून सिलेंडर तीनवेळा घ्यावा लागतो. त्याच्यासाठी इतकी झंझट कशाला हवी.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ? हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.