‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

Marathi ukhane : मजेशीर (Funny) उखाण्यांचे (Ukhane) मग व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. एकमेकांना शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. लग्नसराईच्या मुहूर्तावर असे व्हिडिओ आवडीनं पाहिलेही जातात.

'कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन', यासह ऐका भन्नाट Ukhane
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:30 AM

Marathi ukhane : लग्नसराईचा सध्या मौसम सुरू आहे. लगीनघरात लगीनघाई सुरू आहे. अशावेळी घरात एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. नवरा-नवरीसाठी कपडे, दागिने खरेदी करणं, लग्नपत्रिका छापणं, पाहुणे, मंडप, बस्ता, शिदोरी आणि काय काय… यात काही मजेशीर क्षणही असतात. लग्नात वेगवेगळे विधी पार पाडले जातात. त्यातलाच एक मजेशीर क्षण म्हणजे उखाणा. लग्नात नवरीला उखाण्याशिवाय सोडतच नाहीत. तर दुसरीकडे नवरोबाही या जाळ्यात अडकलेले असतात. नातेवाईक उखाणा ऐकल्याशिवाय वधू आणि वरास सोडत नाहीत. अशा मजेशीर (Funny) उखाण्यांचे (Ukhane) मग व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. एकमेकांना शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. लग्नसराईच्या मुहूर्तावर असे व्हिडिओ आवडीनं पाहिलेही जातात.

नवरा-नवरीची धमाल

व्हिडिओमध्ये विविध ठिकाणच्या लग्नातले नवरा-नवरीचे मजेशीर उखाणे आणि त्याचे व्हिडिओ एकत्र करून हा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. शॉर्ट व्हिडिओ एकत्र करून पाहणाऱ्याला अधिक मनोरंजन व्हावे, हा यामागचा हेतू आहे. उखाणा घेताना एक वातावरण तयार केलं जातं. नवरा नवरी आधीच लाजलेले असतात, त्यात सर्वांचा आग्रह. यामुळे धमाल उडते. ‘जन्म दिला आईने, पालन केले पित्याने, …चे नाव घेते पत्नी या नात्याने’, ‘सोन्याच्या पलंगाला चांदीच्या पट्ट्या, ..चं नाव घेतो ..चा पठ्ठ्या’ ही आणि अशी अनेक उखाणी या व्हिडिओत पाहायला मिळतील.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर आर्ट मेकर्स क्रिएशन (Art Makers Creations) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. खरं तर हा व्हिडिओ 2020मधला आहे. मात्र लग्नसराईमुळे पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. जवळपास 6 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये विविध जोडप्यांची उखाणी आपल्याला ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे उखाण्यात कोरोनानंही एन्ट्री घेतलीय. त्याचीही धमाल यात पाहायला मिळते. Top 25 | नवरा नवरीचे उखाणे | Maharastrian Weddings अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. (Video courtesy – Art Makers Creations)

आणखी वाचा :

Bear in wedding : लग्नसमारंभातल्या व्यवस्थेवर खूश नव्हतं अस्वलाचं कुटुंबं! काय घडलं? पाहा Viral video

Video : ‘पोरीच्या बापानं मागं लागलं पाहिजे, पोरगी कर म्हणून..’ Viral होतंय Shivlila Patil यांचं तुफान विनोदी कीर्तन

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.