VIDEO | बिबट्याने झाडावर उडी मारली आणि माकडाची शिकार केली, लोकांचे डोळे पाणावले
प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडतात. सध्याचा व्हिडीओ सुध्दा लोकांना अधिक आवडला आहे. विशेष म्हणजे बिबट्याने माकडाची शिकार केली आहे, त्याचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.
मुंबई : जे हिंसक प्राणी (Animal news) आहेत, ते शिकार करण्यासाठी आपली ताकद पुर्णपणे लावतात. हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. शिकार करण्यासाठी सगळ्यात जास्त शातिर बिबट्याला (leopard attack) म्हटलं जातं. बिबट्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. आता बिबट्या जंगलात कमी आणि लोकांच्या घरांच्या बाजूला अधिक पाहायला मिळत आहे. शिकार करीत असताना बिबट्या त्याची पूर्ण ताकद लावतो, कारण शिकार हातातून निसटली नाही पाहिजे. विशेष म्हणजे जंगलाचा राजा सिंह समोरुन हल्ला करतो. पण बिबट्या मागून किंवा चोरुन अचानक हल्ला करतो. बिबट्या एका प्राण्यावर अशा पद्धतीने हल्ला करतो, त्याला जरा सुध्दा कल्पना नसते. कधी कधी बिबट्याचा हल्ला सुध्दा फसतो. ज्यावेळी एखादं मोठं जनावर त्यांच्यासमोर असतं. त्यावेळी बिबट्याचा हल्ला फसतो असे अनेक व्हिडीओ (video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा वाईट वाटेल. विशेष म्हणजे बिबट्या एका माकडाच्या मागे लागला आहे. तुम्हाला ही गोष्ट माहित असेल की बिबट्या जमिनीवर आणि झाडावर सुध्दा हल्ला करु शकतो. सध्या असाचं एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याला भूक लागली आहे, त्यामुळे तो शिकारीच्या शोधात आहे. त्याचवेळी त्याला समोर झाडावर एक माकडं दिसलं आहे.
माकडाची शिकार करण्यासाठी बिबट्या पहिल्यांदा झाडावर चढला. बिबट्याला पाहून माकड दुसऱ्या झाडावर गेलं, त्याचवेळी बिबट्यानं सुध्दा त्या झाडावर झेप घेतली. आपला जीव वाचवण्यासाठी माकड पुन्हा त्याच झाडावर आलं. परंतु यावेळी माकडाचं नशीब कमजोर असावं असं म्हटलं जात आहे. ज्यावेळी बिबट्याने झाडावर उडी घेतली. त्यावेळी बिबट्या माकडाला तोंडात पकडून खाली पडला.
This is why Leopards are known as most opportunistic and versatile hunters? pic.twitter.com/ZFjCOkukL9
— Susanta Nanda (@susantananda3) July 15, 2023
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला बिबट्या किती खतरनाक जनावर आहे हे नक्की समजेल. बिबट्या एकदा एखाद्या प्राण्याच्या मागे लागला, तर तो सोडत नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.