मुंबई : सध्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहेत. लिंबाचे दर (Lemon Rate) तर आवाक्याबाहेर गेलेत. सोशल मीडियावर या गोष्टीचा खरपूस शब्दात समाचार घेण्यात येतोय. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पूर आला आहे. भाजी विकणाऱ्या दुकानदाराचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. भाजी विकताना दुकानदार त्याच्या गाण्याने लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतोय. या व्यक्तीने जरी पंजाबी भाषेत गाणं गायलं असलं तरी त्याच्यातले भाव मात्र सर्वांच्या मना-मनातील आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. ‘मैनू लगदा इंडिया सेकेंड लंका है’ (Mainu Lagada India Second lanka Hain), असे या गाण्याचे बोल आहेत. आपण सध्या पाहातो आहोत. की श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. ते सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडत नाहीत. त्याचाच धागा धरत हे गाणं रचण्यात आलं आहे.
भाजी विकणाऱ्या दुकानदाराचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भाजी विकताना दुकानदार त्याच्या गाण्याने लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतोय. या व्यक्तीने जरी पंजाबी भाषेत गाणं गायलं असलं तरी त्याच्यातले भाव मात्र सर्वांच्या मना-मनातील आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. ‘मैनू लगदा इंडिया सेकेंड लंका है’, असे या गाण्याचे बोल आहेत. आपण सध्या पाहातो आहोत. की श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. ते सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडत नाहीत. त्याचाच धागा धरत हे गाणं रचण्यात आलं आहे.
Gurvinder ki behtreen kavita . He is a vegetable seller , somewhere in Punjab I am assuming pic.twitter.com/YGEo5BNLbf
— Shabnam Hashmi (@ShabnamHashmi) April 17, 2022
उन्हाळा सुरू झालाय. अश्यात लिंबू सरबत करण्यासाठी आणि इतर गरजांसाठी लिंबूची मागणी वाढत आहे. सध्या 250 रुपये ते 300 किलो दराने लिंबू मिळत आहेत. गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदाच्या उन्हाळ्यात घडले आहे. उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागत असताना लिंबू उत्पादकांना मात्र मोठा दिलासा मिळताना दिसतोय.
काही दिवसांआधी लिंबू सरबत विक्रेत्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. गौरव सागर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हीडिओला 16 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय. त्याची सोडा ग्लासमध्ये ओतण्याची आणि लिंबूपाणी बनवण्याची पद्धत अनेकांना भावतेय. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा हा बाकी नींबू बाद विच पाऊंगा! व्हीडिओही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. हा व्हीडिओ पंजाबमधील रूपनगरमधील असल्याचं बोललं जातंय.