Viral : …अन् बिबट्यानं भल्या मोठ्या अजगराची केली शिकार, पाहा थरारक Video

Wild animals : एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. ज्यामध्ये अजगर (Python) आणि बिबट्यामधली (Leopard) झुंज पाहायला मिळते. दोघांच्या या चुरशीच्या लढाईत कोण जिंकले आणि कोण हरले याचा अंदाज लावता येईल.

Viral : ...अन् बिबट्यानं भल्या मोठ्या अजगराची केली शिकार, पाहा थरारक Video
बिबट्या आणि अजगराची झुंज
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:57 AM

Wild animals : सिंह, वाघ, बिबट्या आणि साप अनेकदा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. जर आपण या प्राण्यांमध्ये बिबट्याबद्दल बोललो तर ते अत्यंत चलाख शिकारी म्हणून ओळखले जातात. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला आपली शिकार बनवतो, पण बिबट्याची सापाशी झुंज तुम्ही क्वचितच पाहिली असेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. ज्यामध्ये अजगर (Python) आणि बिबट्यामधली (Leopard) झुंज पाहायला मिळते. ती पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बिबट्या हा असा शिकारी आहे जो अतिशय हुशारीने आपल्या भक्ष्याची शिकार करतो आणि दुसरीकडे अजगराने जर एकदा आपली शिकार पकडली तर त्याला निसटणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत दोघांच्या या चुरशीच्या लढाईत कोण जिंकले आणि कोण हरले याचा अंदाज लावता येईल.

…अन् निघून जातो

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक बिबट्या पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येतो आणि तिथे त्याची नजर छोट्या अजगरावर पडते. अशा स्थितीत संधी मिळताच तो हल्ला करून तोंडात दाबतो. यादरम्यान, अजगरही त्याच्यावर प्रत्युत्तर देतो पण बिबट्या स्वत:ला सावरतो आणि व्हिडिओच्या शेवटी तो त्याला दाबून निघून जातो.

इन्स्टाग्रामवर शेअर

wild_animals_creation नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका यूझरने कमेंट करत लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला समजले, की याला जंगलातील सर्वात निर्दयी शिकारी का म्हटले जाते. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘जंगलात काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. विशेष म्हणजे अजगर नाहीत. विषारी, पण ते त्यांचा शिकार सहजासहजी सोडत नाहीत. जर कोणी अजगराच्या पकडीत आला तर ते मरेपर्यंत त्याचा गळा दाबतात. अजगरही बिबट्यासाठी धोकादायक ठरू शकतो, पण इथे बिबट्याचे कौतुक करायला हवे, कारण त्याने आपल्या बुद्धीने ही लढाई तर जिंकलीच, पण अजगरालाही मारले.

आणखी वाचा :

Biggest roll : ‘हा’ पदार्थ पाहुन तोंडाला पाणी सुटेल, पण घरी करू शकणार आहात का? पाहा Video

Amazing ping pong : ‘असा’ खेळ पाहुन तुम्हालाही Table tennis खेळावंसं वाटेल, पाहा ‘हा’ Viral video

Jugaad Viral video : पैसे वाचवण्याची Ninja technique; यूझर्स म्हणतायत, ‘बादशहा’तलं ‘ते’ गाणं जरा जास्तच Seriously घेतलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.