Video | बिबट्या पिल्लाशी खेळतोय, लोकांना व्हिडीओ आवडला, म्हणतात…
Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक बिबट्या आणि त्याचं पिल्लू खेळत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.
मुंबई : सोशल मीडियावरील प्राण्यांचे (Animal Viral Video) अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. लोकांना सोशल मीडियावरील प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडत असल्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असतात. बिबट्याचे रोज असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ अधिक चांगले असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या (Mother Leopard) आणि त्याचं पिल्लू (Leopard Cubs) खेळत असल्याचं दिसत आहे. आम्हाला आशा आहे की हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे, त्याचपद्धतीने तुम्हाला देखील आवडेल.
बिबट्याचं एक छोटं पिल्लू त्यांच्या आईच्या शेपटीशी कित्येक वेळ खेळत आहे. छोटं पिल्लू दिसायला एकदम क्यूट असून लोकांना अधिक आवडलं आहे. विशेष म्हणजे झोपलेल्या आईला बिबट्याचं पिल्लू त्रास देत आहे. आई सुध्दा त्या पिल्लाला प्रतिसाद देत खूष करीत आहे.
हा व्हिडीओ 11 हजार लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दररोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी लोकं प्राण्यांचे व्हिडीओ अधिक पाहत आहेत. वाघ, हत्ती, अस्वल, माकडं याचे अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ अधिक लोकांना अधिक आवडला आहे.
The bond that connects ? Nature is Amazing ?
?️ SM pic.twitter.com/jV9PG9FVww
— M V Rao @ Public Service (@mvraoforindia) May 4, 2023
गावाकडं उसाच्या शेतामध्ये अनेकदा बिबट्याची पिल्ली शेतकऱ्यांना आढळून आली आहेत. ती त्यांनी वनविभागाच्या ताब्यात दिल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.