VIDEO | विहिरीत पडला बिबट्या, बाहेर काढण्यासाठी लोकांनी केला ‘जुगाड’, बचावाचा व्हिडिओ पाहून…
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी लोकांनी जुगाड केला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.
मुंबई : कधी कधी जंगलात प्राणी अशा स्थितीत फसतात की, त्यांना तिथून बाहेर निघणं शक्य होत नाही. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी (viral video) त्यांची मदत करतात. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक वनविभागाचे कर्मचारी आणि गावकरी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याला (leopard)वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. ट्विटरच्या (twitter viral video) माध्यमातून एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ग्रामस्थ एक जुगाड करुन बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या धाडसी लोकांचं कौतुक देखील केलं आहे.
एक शिडी तयार केली
सहाना सिंह यांच्याकडून तो छोटासा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोकांनी जळत असलेला गोळा खाली टाकला. जशी-जशी क्लिप पुढे जात आहे. ग्रामस्थांनी बिबट्याला बाहेर येण्यासाठी एक शिडी तयार केली आहे. तो बिबट्या शिडीचा आधार घेऊन बाहेर आला आहे.
जुगाड अनेकांना आवडला
त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, कर्नाटक राज्यात ज्यावेळी एक बिबट्या विहिरीत पडला होता. त्यावेळी त्याला एक शिडी देण्यात आली होती. शिडी देऊन सुध्दा तो बिबट्या बाहेर येत नव्हता. त्यावेळी त्या लोकांनी बिबट्याच्या जवळ एक आगीचा गोळा ठेवला. बिबट्या आगीला घाबरल्यामुळे तो पटकन शिडीवरुन बाहेर आला. जवळच्या जंगलात पळून गेला. त्यावेळी तिथं असलेली लोकं एकदम आनंदी झाली. लोकांचा जुगाड अनेकांना आवडला आहे.
Somewhere in Karnataka. A leopard fell into a well and even when a “ladder” was offered, it was cowering inside. So they put a stick of fire near his bum which forced him to climb the scaffolding & run away into the jungle. How they rejoice! Man, Nature & Jugaad. ? Got it on WA. pic.twitter.com/OBr7kDTmlp
— Sahana Singh (@singhsahana) June 22, 2023
व्हिडीओ १ लाख लोकांनी पाहिला
व्हिडीओ १ लाख लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला अधिक साऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक लोकांनी बिबट्याला वाचवणाऱ्या टीमचे आभार मानले आहेत. परंतु काही लोकं त्यांच्या जुगाडामुळे चिंतीत आहेत.