Wild Animal Video : बिबट्या (Leopard) हा आशिया आणि आफ्रिका खंडात आढळणारा एक धोकादायक प्राणी आहे. सिंह (Lion), वाघ (Tiger) आणि चित्ता (Panther) यांसारख्या प्राण्यांच्या तुलनेत बिबट्यादेखील अतिशय शक्तिशाली प्राणी आहे. अत्यंत चपळ… जेव्हा संधी मिळते तेव्हा तो सर्वात मोठ्या प्राण्यालाही फाडून टाकतो. बिबट्याची एकाग्रता अतिशय अद्भुत आहे आणि तो एक अतिशय हुशार प्राणी आहे. बिबट्याची शिकार पकडण्याचे तंत्र आणि हल्ल्याची शैली यामुळे तो उच्च दर्जाचा शिकारी बनतो, असे म्हटले जाते. बिबट्या सहसा रात्री शिकार करतात आणि ताशी 55 ते 60 किमी वेगाने पळून त्यांची शिकार पकडतात. बिबट्या आपल्या भक्ष्याला एवढ्या वेगाने पकडतो, की आपण शिकार कधी झालो हेही शिकाराला कळत नाही.
तुम्ही विचार करत बसाल
सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बिबट्या भिंतीच्या वरच्या तारांवर चालताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना भीतीही वाटतेय. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की बिबट्या तारांवर अशा प्रकारे धावत आहे की तुम्हीही विचार करत बसाल, की एवढ्या कठीण वाटेवरून तो कसा जात आहे? हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर
कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. भिंतीवर असलेल्या लोखंडी तारेतून निसटून बिबट्या अतिशय चपळाईने पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान कारमध्ये बसलेले लोक काच उघडण्याबाबत बोलतात. मात्र, यावेळी काही लोक घाबरतानाही दिसत आहेत. बिबट्या काहीवेळ एका जागी थांबून उभा राहतो. मग तो वळून गाडीकडे पाहतो. त्यानंतर लोक घाबरून गाडीची खिडकी बंद करतात. इन्स्टाग्रामच्या nature27_12 पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.