Viral Video : झेब्राच्या पिल्लावर हल्ला, आईच्या निर्धारापुढे सिंहाचाही नाही लागला टिकाव, पाहा थरारक व्हीडिओ…

Viral Video : सिंह आपली भूक भागवण्यासाठी झेब्राच्या पिल्लावर हल्ला करतो. पण आई आपल्यापिल्लाला सिंहाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावते. ती सिंहाच्या इतकीच ताकद लावून आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवते.

Viral Video : झेब्राच्या पिल्लावर हल्ला, आईच्या निर्धारापुढे सिंहाचाही नाही लागला टिकाव, पाहा थरारक व्हीडिओ...
सिंहाचा झेब्राच्या पिल्लावर हल्ला
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 11:54 AM

मुंबई : सिंह (lion) म्हणजे जंगलाचा अनभिषिक्त सम्राट. त्याने एखाद्या प्राण्यावर हल्ला केला तर त्याच्या तावडीतून सुटणं जवळपास अशक्यच… पण आईची माया आणि तिचं आपल्या पिल्लावरचं प्रेम काय करू शकतं हे एका व्हीडिओतून समोर आलं आहे. सिंह आपली भूक भागवण्यासाठी झेब्राच्या (zebra) पिल्लावर हल्ला करतो. पण आई आपल्यापिल्लाला सिंहाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावते. ती सिंहाच्या इतकीच ताकद लावून आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवते. ही झेब्रा मादी सिंहाला मागच्या पायांनी जोरदार लाथ मारताना दिसते. आईचा आक्रमकपणा पाहून शेवटी सिंहही हतबल होतो आणि पिल्लाला सोडून देतो. त्यानंतर आईही तिथून सुखरूप निघून जाते. थोडक्यात काय तर जंगलाच्या राजाला आईच्या प्रेमा पुढे आणि तिच्या इच्छाशक्तीपुढे हार मानावी लागते. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नेमकं काय घडलं?

सिंह आपली भूक भागवण्यासाठी झेब्राच्या पिल्लावर हल्ला करतो. पण आई आपल्यापिल्लाला सिंहाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावते. ती सिंहाच्या इतकीच ताकद लावून आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवते. ही झेब्रा मादी सिंहाला मागच्या पायांनी जोरदार लाथ मारताना दिसते. आईचा आक्रमकपणा पाहून शेवटी सिंहही हतबल होतो आणि पिल्लाला सोडून देतो. त्यानंतर आईही तिथून सुखरूप निघून जाते.

wild animal shorts या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. “झेब्राच्या आईने सिंहावर हल्ला केला”, असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.

यावर अनेकांनी कमेंट केली आहे. आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या झेब्रा मादीचं कौतुक केलं आहे. आईची माया अशीच असते आपल्या बाळाला ती कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो आईच्या प्रेमासमोर कोणत्याही संकटाचा टिकाव लागू शकत नाही. तर आणखी एकजण म्हणतो की आईच्या प्रेमाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.

सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओतील झेब्रा, तिचं पिल्लू आणि सिंह यांची झुंज पाहायला मिळतेय. जी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

संबंधित बातम्या

VIDEO : जेवणासाठी कुत्र्याने केला खास जुगाड, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

Social Media Trending : घोड्याचा लोकल प्रवास, सोशल मीडियावर व्हायरल

Video : ट्रॅफिक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.