Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!

Puppy videos funny : प्राण्यांनी कधीही आरसा (Mirror) पाहिला नसल्यामुळे, त्याचा वापर केला नसल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं. आजकाल असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा (Puppy) स्वतःला आरशात पाहून आगळीच प्रतिक्रिया देत आहे.

Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!
आरशात पाहून प्रतिक्रिया देणारा कुत्रा
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:30 AM

Puppy videos funny : एखादी नवीन गोष्ट पाहिल्यावर लहान मुलांची प्रतिक्रिया कशी असते, हे तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल. त्यांच्यासाठी काहीही नवीन असलं तरी त्यांनी याआधी काहीही पाहिलेलं नसतं. त्यामुळे साहजिकच त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक असते. लहान मुलं सोडली तर मोठ्यांनाही नवं काही मिळालं तर नवलच. आजच्या काळात मानवानं बरीच प्रगती केली आहे आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या आहेत, परंतु प्राण्यांसाठी मात्र सर्वच गोष्टी आश्चर्यकारक असतात. विशेषतः आरसा. प्राण्यांनी कधीही आरसा (Mirror) पाहिला नसल्यामुळे, त्याचा वापर केला नसल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं. आजकाल असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा (Puppy) स्वतःला आरशात पाहून आगळीच प्रतिक्रिया देत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कुत्रा स्वतःला आरशात पाहून कशी प्रतिक्रिया देत आहे.

स्वत:वरच भुंकतो

कुत्रा आधी उभा राहतो आणि काही वेळ आरशात स्वतःकडे पाहतो आणि मग खाली बसतो. त्यानंतर त्याचं विचित्र काम सुरू होतं. तो एक पाय उचलतो आणि हलवतो आणि स्वतःला आरशात पाहतो. मग थोड्या वेळानं तो दुसरा पाय उचलतो आणि तेच करतो. खरं तर, त्याला असं वाटतं की समोर कोणीतरी बसलं आहे आणि तो देखील त्याच प्रकारे प्रतिक्रिया देत आहे. काही वेळानं तो उभा राहतो आणि आरशाकडे पाहून भुंकतो. तो आरशात स्वत:ला पाहतोय की त्याच्यासमोर कुणीतरी उभं आहे, असा तो बराच वेळ गोंधळून जातो.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘कुत्रा पहिल्यांदा स्वतःला आरशात पाहत आहे’ असं कॅप्शन लिहिलं आहे. अवघ्या 39 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाख 38 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 54 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.

‘चालाक कुत्ता है’

व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, ‘चालाक कुत्ता है. पता लगा ही लिया कि छवि वास्तविक नहीं है’, तर दुसर्‍या यूझरनं कमेंट केली, की हा ‘ये क्यूटनेस से भरा वीडियो है’. त्याचप्रमाणे, इतर अनेक यूझर्सनी व्हिडिओ अतिशय गोड आणि कुत्रा गोंडस असल्याचं म्हटलं आहे.

Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral

Monkey Video Viral : इतका लोभी, की हातातलं सगळं गमावून बसतं ‘हे’ माकड

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.