Kid puppy video : सोशल मीडियावर कधी, कोणाचा आणि कोणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, काही सांगता येत नाही? दररोज हजारो व्हिडिओ शेअर केले जातात, परंतु काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला खूप आवडतात. आजकाल असा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. फटाक्यां(Firecrackers)च्या आवाजाने कुत्र्यां(Dogs)ना त्रास होतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. कारण ते आवाज आपल्यापेक्षा 25 टक्के जास्त ऐकतात. त्यामुळेच फटाक्यांचा आवाज ऐकून कुत्रे अस्वस्थ होतात. नुकताच असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये फटाक्यांच्या आवाजाने कुत्रा त्रस्त होतो. पण त्याच्या शेजारी एक निरागस मुलगी (Cute girl) उभी होती. तिने असे काहीतरी केले की सर्वांचेच मन जिंकले. मुलीच्या या निरागसपणाने यूझर्सची मने जिंकली असून हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
कुत्र्याच्या रक्षणासाठी…
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका मुलीने तिच्या हातांनी कुत्र्याचे कान झाकले होते, जेणेकरून फटाक्यांच्या आवाजाने त्याला त्रास होऊ नये. फटाके वाजणे थांबताच तिने त्याच्या कानावरून हात काढला. तिने कुत्र्याच्या डोक्यावर थोपटून त्याचे सांत्वन केले आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहिली.
ट्विटरवर शेअर
हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा 16 सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ ट्विटर यूझर टोंग बिंगक्स्यूने शेअर केला आहे. याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, की चीनी नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान हृदयस्पर्शी क्षण. फटाक्यांची भीती टाळण्यासाठी एक लहान मुलगी आपल्या पाळीव प्राण्याचे कान झाकते. तसेच हा व्हिडिओ दक्षिणपूर्व चीनच्या जिआंगशी प्रांतात शूट करण्यात आल्याचेही म्हटले आहे.
“मुलांच्या हृदयात कोणासाठीही फसव्या भावना नसतात.”
जेव्हा लोकांनी या मुलीचे कुत्र्यावरील प्रेम पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. एका यूझरने म्हटले, “मुलांच्या हृदयात कोणासाठीही फसव्या भावना नसतात.” दुसर्याने लिहिले, “कुणीतरी सत्य सांगितले आहे की प्रेमाचे वर्णन करता येत नाही! याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
Kid comforts puppy during fireworks by covering its ears..???♥️ pic.twitter.com/hAQn8bwAFg
— ?o̴g̴ (@Yoda4ever) February 2, 2022