Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मम्मी-पप्पाच्या लग्नात मुलीचे गोड नखरे, रडून-रडून जिंकलं सर्वांच मन, एकदा व्हिडीओ पाहाच

सध्या एका लग्नात छोट्याशा मुलीचे गोड नकरे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (little girl crying parents wedding video)

Video | मम्मी-पप्पाच्या लग्नात मुलीचे गोड नखरे, रडून-रडून जिंकलं सर्वांच मन, एकदा व्हिडीओ पाहाच
मुलगी अशा प्रकारे आपल्या पालकांच्या लग्नात रडत होती.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 4:29 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी कशाची चर्चा होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियाचं विश्व एवढं व्यापक आहे, की येथे रोज नवनव्या भन्नाट गोष्टी ट्रेंड होतात. कधी तरुणीने कॉलेज कँपसमध्ये तरुणाला केलेल्या प्रपोजची चर्चा होते, तर कधी नवरीने होणाऱ्या पतीकडे केलेली मागणी ट्रेंडिंवर येते. सध्या एका लग्नात छोट्याशा मुलीचे गोड नखरे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ती आपल्या आई-वडिलांच्या लग्नात चक्क रडते आहे. (little girl crying in her parents wedding cute video going viral)

भारत देशात लग्नाआधी सहसा मुलं होत नाहीत. परुंतु आधी आपत्य आणि नंतर लग्न या लग्नपद्धतीला विदेशात मान्यता आहे. असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या लग्नात ज्या दाम्पत्याचे लग्न होत आहे, त्यांच्या मुलीने तिच्या गोड नखऱ्यांनी सर्वांचं मन जिंकलं आहे.

पाहा लहाना मुलीचा तिच्या आईवडिलांच्या लग्नातील व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Sara Wickman (@saradiane_)

आई-वडिलांचे लक्ष नसल्यामुळे मुलीचे नखरे

विकमन या इंन्स्टाग्राम खात्यावरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये गोड मुलीचे खट्याळ नाटक तुम्हालाही दिसेल. स्टेजवर वधू आणि वर लग्नाच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे त्यांची मुलगी कारपेटवर झोपली आहे. बरं ती फक्त झोपत नाहीये तर मधून-मधून ती वड डोकं करुन तिच्या आई-वडिलांकडे पाहत आहे. जेव्हा तिच्याकडे तिच्या आईवडिलांचे लक्ष्य नाही, हे तिला समजते, तेव्हा ती पुन्हा रडणं सरु करतेय. आईने उचलून घेण्यासाठी ती रडत आहे. हा नजारा पाहून लग्नसमारंभात आलेल्या पाहूण्यामध्ये चांगलाच हशा पिकल्याचं दिसतंय.

व्हिडीओचा दुसरा भागसुद्धा व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताना “ही आमची मुलगी आहे. हिने आमच्या लग्नामध्ये खूप ड्रामा केला. आमच्या लग्नामध्ये आमची मुलगी खूप रडू लागली” असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे. या व्हिडीओच्या शेवटी नवरीने म्हणजेच मुलीच्या आईने रडणाऱ्या आपल्या छोट्याशा मुलीला उचलून घेतलं आहे. या व्हिडीओचा दुसरा भागसुद्धा विकमन याच इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट करण्यात आलाय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काही क्षणांत व्हायरल झाला आहे. मुलीच्या रडण्याचा दुसरा व्हिडीओसुद्धा लोकांना चांगलाच आवडला आहे. दुसऱ्या व्हिडीओत मुलगी जमिनीवर नाहीये. तर छोट्या मुलीला तिच्या आईने उचलून घेतले आहे. यावेळी सुद्धा अनेक मजेदार घटना घडल्या आहेत. मुलगी जवळ असल्यामुळे नवरीला अंगठी घालण्यास अडचणी येत आहेत. वर आपल्या होणाऱ्या पत्नीला अंगठी घालताना दिसत आहे. त्याटवेळी अंगठी नवरीच्या बोटातून निसटून पडतेय. ही सगळी फजीती एका छोट्याशा मुलीमुळे झाल्याचे समजल्यामुळे वधू-वर आणि पाहूण्यांमध्ये चांगलाच हशा पिकलेला दिसतोय. एवढा सारा प्रकार घडत असूनसुद्धा मुलगी आपल्या आईपासून दूर होत नाहीये.

हा सगळा प्रकार एकंदरीत मजेदार असल्यामुळे या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलेच लाईक्स मिळत आहेत. छोट्याशा मुलीचे नखरे पाहून सगळे खुश होत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

(little girl crying in her parents wedding cute video going viral)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.