होय..! ‘ती’ सर्वकाही करू शकते, ‘या’ चिमुरडीला पाहून तुम्हीही हेच म्हणाल; Kid stunt video viral
Kid stunt video : सोशल मीडियावर (Social media) अनेकदा सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात, ज्यात लहान मुलांशी (Child) संबंधित व्हिडिओही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी सायकलवर स्टंट करताना दिसत आहे.
Kid stunt video : लहान मुले ही आता लहान नाही तर मोठ्यांचेही ‘बाप’ झाले आहेत. ज्याप्रमाणे सध्या महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, त्याचप्रमाणे लहान मुलेही मोठ्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. फक्त त्यांची उंची लहान पण काम मात्र मोठे करताना दिसतात. विशेषत: स्टंटबाजी आणि अप्रतिम पराक्रमांचा विचार केला तर आजकाल तरुणांसोबतच मुलांमध्येही याची क्रेझ वाढली आहे. मुलेही आता अप्रतिम स्टंट करताना दिसतात. सोशल मीडियावर (Social media) अनेकदा सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात, ज्यात लहान मुलांशी (Child) संबंधित व्हिडिओही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी सायकलवर अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात.
पायाने उचलचे सायकलचे मागचे चाक
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की सायकल चालवत असताना ती मुलगी अचानक सीटवरून उतरते आणि हँडल वळवून त्यावर पुढे उभी राहते. यानंतर ती चालताना सायकलचे मागील चाक पायांच्या साहाय्याने उचलते आणि सायकल अगदी जोशात फिरवते. त्यानंतर ती पुन्हा सायकल चालवायला लागते. तिच्या सायकलची सुरुवात आणि शेवट पाहून ती सायकलवर एवढा धोकादायक स्टंट कसा करू शकते, याचा अंदाजही येत नाही. तिला स्टंट करताना पाहून जणू काही स्वप्नच असल्यासारखे वाटते, कारण सहसा अशी लहान मुले फक्त सायकल चालवायला शिकत असतात, स्टंटबाजी तर सोडाच.
There’s nothing she can’t. She’s capable, She’s a Dreamer, She’s an Achiever! Let’s commit to ensuring them equal opportunities, a cohesive & progressive ecosystem, they deserve. Happy #InternationalWomensDay.#IWD2022 #WomensDay pic.twitter.com/AfYsCtlyXd
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 8, 2022
ट्विटर हँडलवर शेअर
हा जबरदस्त व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ती करू शकत नाही असे काहीही नाही. ती सक्षम आहे, ती स्वप्न पाहणारी आहे, ती एक साध्य करणारी आहे!’. 28 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आणि मुलीच्या या अप्रतिम प्रतिभेचे कौतुक केले.