VIDEO | रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला चिमुरडीने पाजले पाणी, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी…
रस्त्यात एक चिमुकली एका वयोवृध्दाला पाणी पाजत असताना दिसत आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : एक मुलगी एका वयोवद्ध आजोबाला (Grandfather) रस्त्याच्या कडेला पाणी पाजत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (viral video)अधिक व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. एक मुलगी पाण्याची बाटली (water bottel) हातात पकडून त्या वयोवृध्द व्यक्तीला पाणी पाजत आहे. कारण ती वयोवृध्द व्यक्ती पाण्याची बाटली हातात पकडण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी त्या चिमुकलीचं कौतुक केलं आहे.
व्हिडीओमध्ये एक वयोवृध्द आजोबा रस्त्याच्याकडेला बसले आहेत. त्यावेळी त्याचे हात थरथरत आहेत. त्यांची आरोग्यस्थिती योग्य नसल्यामुळे अशी त्यांची अवस्था झाली आहे. आजोबांची वाईट अवस्था पाहून चिमुकली त्यांना पाणी पाजत आहे. त्याचवेळी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कुणीतरी कैद केला आहे. विशेष म्हणजे पाणी पाजत असताना त्या चिमुकलीने त्यांच्या पाठीवर हात ठेवला आहे.
इंटरनेटवरती व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना आनंद झाला आहे. नेटकरी अधिक खूश झाल्याचं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. प्रत्येकजण त्या मुलीचं कौतुक करीत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओ अनेकांचं मन जिंकलं आहे. आतापर्यंत 1.5 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर चांगले व्हिडीओ पटकन व्हायरल होतात. त्याचबरोबर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आनंद होतो.