‘माझ्या डोळ्यात बघा…’, महिला खासदाराचे म्हणणे ऐकून सभापती लाजले, पाहा VIDEO

| Updated on: Jul 01, 2024 | 6:21 PM

पाकिस्तानच्या संसदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिला खासदाराने सभागृहात सभापतींना असे काही सांगितले की त्यांनाही लाज वाटली. सभापतींच्या वक्तव्यावर संपूर्ण सभागृहाला हसू फुटले.

माझ्या डोळ्यात बघा..., महिला खासदाराचे म्हणणे ऐकून सभापती लाजले, पाहा VIDEO
Follow us on

पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ लोकांचं मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ पाहून राग देखील येतो. सध्या पाकिस्तानच्या संसदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकं प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष आणि एक महिला खासदार यांच्यातील हे संभाषण आहे. संसदेत अशा काही गोष्टी बोलल्या गेल्या ज्यामुळेसंसदेचे वातावरण रोमँटिक झाले आहे अशा प्रतिक्रिया लोकं देत आहेत.

इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या जरताज गुल असे या महिला खासदाराचे नाव आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान जरताज गुल  सभापतींना म्हणाल्या की, ‘सभापती महोदय, मला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे’, त्यावर सभापतींनी ‘हो कृपया’ असे म्हटले. यानंतर महिला खासदार म्हणाल्या, ‘माझ्या नेत्याने मला डोळ्यात बघून बोलायला शिकवलं आहे. सर, त्याशिवाय मी बोलू शकत नाही. त्यावर  सभापती म्हणाले की, ‘मी ऐकेन, बघणार नाही. एखाद्या स्त्रीशी डोळ्यात डोळे घालून बघणे चांगले दिसत नाही. मी कोणत्याही स्त्रीच्या डोळ्यात दिसत नाही. सभापतींच्या या वक्तव्यावर संपूर्ण सभागृहाला हसू आले त्यानंतर त्या महिला खासदारही हसू लागल्या.

सभापती आणि महिला खासदार यांच्यातील या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ लोकं ट्विटरवर शेअर करत आहेत. @Bitt2DA नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘पाकिस्तानच्या संसदेत रोमँटिक वातावरण आहे’ असे या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 39 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘स्पीकर साहेब सज्जन दिसतात. थरूर सर उपस्थित नव्हते हे चांगले आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘संसदेचे वातावरण खूपच काव्यमय आहे. त्यामुळेच देशाची ही अवस्था झाली आहे.