सात फूटांची ललना शोधतेय बॉयफ्रेंड, महिन्याची कमाई तब्बल 6 कोटी, म्हणाली जोडीदार असा हवा की…
मेरी टेमारा हीची महिन्याची कमाई सहा कोटी रुपये आहे. तिला आता जोडीदार हवा आहे. तिने तिच्या अपेक्षा जाहीर केल्या आहेत. तिची उंची तिच्या लग्नातीस अडचण ठरली आहे.....
समाजात आपल्या जोडीदाराविषयी काही संकल्पना ठरलेल्या आहेत. आपण नेहमी वर निवडताना तो उंच असायला हवा, तर वधूची उंची कमी असली तरी चालेल असा विचार करीत असतो. त्यामुळे ज्या मुलींची उंची जास्त असते त्यांना चांगला जोडीदार मिळणे कठीण काम होऊन बसते. या अशा उंच मुलीपासून ज्यांची हाईट कमी आहे ते तर दूरच पळतात. ही समस्या काही भारतातच आहे असे नाही तर परदेशात देखील आहे. काही लोकांना उंची कमी असल्याने प्रॉब्लेम होतो. तर काहींना उंची प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने देखील जोडीदार मिळताना अडचणींचा डोंगर समोर असतो.
परंतू काही जण स्वत: च्या हिंमतीवर आयुष्य कंठतात. त्यांच्याशी कोणीही लग्न करण्यास एका पायावर तयार असते. आज आपण अशा महिलेची कहाणी ऐकणार आहोत जी उंची सात फूट आहे. ही सुंदरी महिन्याला सहा कोटी रुपये सहज कमावते. आता ती तिच्यासाठी जोडीदार शोधत आहे. या महिलेचे नाव मेरी टेमारा असे आहे. तिचे जोडीदाराविषयी काही जास्त मागणे नाही. ती म्हणजे माझा होणारा जोडीदार श्रीमंत असो वा गरीब ? मला काही फरक नाही पडत. उंच नसला आणि बुटका असला तरी चालेल. त्याने काहीही फरक पडत नाही. 28 वर्षांच्या मेरी टेमारा हिचे म्हणणे आहे की तिची लव्ह लाईफ आतापर्यंत खूपच वाईट गेली आहे. मला त्याची काही परवा नाही. कारण ती आता चांगले पैसे कमावित आहे.
मेरी टेमारा हिच्या पोस्ट येथे पाहा –
View this post on Instagram
एका महिन्याची कमाई
टिकटॉक पासून इंस्टाग्रामवर मेरी शॉर्ट्स किंग नावाच्या व्यक्तीसोबत आढळते. हा व्यक्ती मेरीचा सर्वात मोठा समर्थक आहे. हा उंचीने कमी आहे. या दोघांची जोडी कमाल आहे. एक बुटका तर दुसरी सर्वात उंच इन्फ्लूएन्सर दोघांच्या जोडीला लोक खूप पसंत करीत आहेत. कधी मेरी या ‘शॉर्ट किंग’ला हाताने उचलून वर खाली नेत एस्करसाईज करते. तर कधी रोमांटिक अंदाजात दोघे दिसतात. परंतू दोघात तसं काही नाही. कधी काळी उंचीमुळे तिला बॉडी शेमिंगचा शिकार व्हावे लागले होते. परंतू याच उंचीला तिने आपली ताकद सिद्ध करीत ती जगप्रसिद्ध झाली आहे. आता मेरी सोशल मिडिया आणि सब्सक्रिप्शन प्लॅटफॉर्मवर नियमित रुपाने कंटेंट अपलोड करीत असतात. एका महिन्यात ती 800,000 डॉलर ( सुमारे 6 कोटी 73 लाख रुपये) पर्यंत कमावते.