इंधन संपले, बॅटरी डाऊन झाली आणि…. मंगळयान मोहिमेचा The End…

ही मोहिम यशस्वी झाली असून मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

इंधन संपले, बॅटरी डाऊन झाली आणि.... मंगळयान मोहिमेचा The End...
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 11:49 PM

नवी दिल्ली : इंधन संपले, बॅटरी डाऊन झाली… आणि भारताची मंगळयान मोहिम फत्ते झाली. मंगळयान मोहिम अर्थात मार्स ऑर्बिटर मिशनने (MOM) यशस्वी पल्ला गाठला आहे. तब्बल आठ वर्षे आठ दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ही मोहिम संपष्टात आली आहे. ही मोहिम यशस्वी झाली असून मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

5 नोव्हेंबर 2013 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारातचे मंगळयान अवकाशात झेपावले . 24 सप्टेंबर 2014 रोजी यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

ही मोहिम संपल्याचे इस्रोने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. मंगळयानमध्ये आता कोणतेही इंधन शिल्लक नाही. याची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. मंगळयानाशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र, इस्रोने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

मंगळयान मोहिमेची वैशिष्टे

  1. मंगळयानच्या मार्स कलर कॅमेऱ्यातून घेतलेल्या 1000 हून अधिक फोटोंवरून मार्स अॅटलस तयार करण्यात आला आहे.
  2. मंगलयानमध्ये मिथेन वायूचे अस्तित्व जाणून घेणारी सेन्सर यंत्रणा
  3. मंगळावरील वातावरणाचा अभ्यास
  4. मंगळावर मिथेनचा अंश जरी मिळाला तरी, मंगळावर जीवनाच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचे अस्तित्व सिद्ध होईल.
  5. मंगळावरील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.

मंगळयान ही इस्त्रोची पहिली इंटर-प्लॅनेटरी मोहीम होती. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या मोहिमेसाठी 450 कोटींचा खर्च आला. यशस्वी मंगळ अंतराळ यानाचे चित्र भारताच्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूवर आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.