Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच

व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला अगदीच निर्भयपणे हाताळतो आहे. त्याने सापाला आपल्या लुंगीमध्ये टाकलंय. ( man play with snake video)

Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच
snake in lungi
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 7:09 PM

मुंबई : जगामध्ये अनेक विषारी प्राणी आहेत. त्यामध्ये साप विंचू ही उदाहरणं सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, यातील सापाचे नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. अनेकांना साप म्हटलं की थरथरायला होतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला अगदीच निर्भयपणे हाताळतो आहे. (lungi man play with snake and put it in his lungi video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

या व्हिडीओमध्ये एक मोठा साप दिसतो आहे. एका व्यक्तीने या सापाच्या शेपटीला पकडलेले आहे. शेपटीला पकडल्यामुळे या सापाला काहीही करता येत नाहीये. तरीदेखील हा साप चलाखीने त्या माणसावर झेप घेतोय. मात्र, सापाने झेप घेताच हा माणूस स्वत:ला सापापासून वाचवतोय. बाजूला लांब काही माणसे उभी असल्याचे दिसतेय. साप मोठा असल्यामुळे या माणसाकडे कोणी जात नाहीये. मात्र, साप पकडलेल्या माणसाचा निर्भयपणा पाहून अनेकजण चकित झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

साप थेट लुंगीमध्ये टाकला

व्हिडीओमध्ये पकडलेल्या या सापाला अनेकजण बघताना दिसत आहेत. गर्दी जमल्यामुळे हा साप गोंधळल्यासारखा वाटतोय. याच कारणामुळे तो लुंगीवाल्या माणसावर झेप घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याचा हा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. शेवटी सापाची हालचाल आणि त्याचा पळून जाण्याचा बेत असल्याचे लक्षात येताच लुंगीवाल्या माणसाने तोच साप थेट आपल्या लुंगीमध्ये टाकलाय. साप लुंगीमध्ये टाकल्यानंतर बाजूला उभ्या राहिलेल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी या माणसाच्या धाडसाला सलाम ठोकला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने आज मला समजलं की लुंगीचे अनेक उपयोग आहेत, असे म्हटलंय. तर एकाने असा वेडेपणा केल्यामुळेच अनेक सर्पमित्रांचा जीव गेलेला आहे, असेसुद्धा एकाने म्हटलेय. हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 8 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट ‘अल्लाह-अल्लाह’, नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Love you Zindagi वर नाचणाऱ्या तरुणीवर आयुष्य रुसलं, 30 व्या वर्षीच अखेरचा श्वास

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

(lungi man play with snake and put it in his lungi video goes viral on social media)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.