भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथल्या गावकऱ्यांचे बँकांमध्ये आहेत करोडो रुपये
म्हटलं की गावासाठी गरजेचा असलेला 'विकास' आठवतो. पण तुम्हाला माहितीये का की आपल्या भारतात एक असं गावं आहे ते सर्वात श्रीमंत गाव मानलं जातं. या गावातील लोकांचे चक्क करोडो रुपये बॅंकांमध्ये जमा आहेत.

गावं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती पत्र्याची घरे किंवा कौलारू घरे, कच्चे रस्ते , पाण्याची टंचाई वैगरे बरचं काही. एकंदरीत गावं म्हटलं की गावासाठी गरजेचा असलेला ‘विकास’ आठवतो. पण तुम्हाला माहितीये का की आपल्या भारतात एक असं गावं आहे ते सर्वात श्रीमंत गाव मानलं जातं. या गावातील लोकांचे चक्क करोडो रुपये बॅंकांमध्ये जमा आहेत.
भारतातच नाही तर आशियातील सर्वांत श्रीमंत गाव
हे गाव आहे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात स्थित ‘माधापर गाव’. हे गाव फक्त आपल्या भारतातच नाही तर आशियातील सर्वांत श्रीमंत गाव आहे. गावाची समृद्धी इतकी आहे की गावातील रहिवाशांनी स्थानिक बँकांमध्ये अंदाजे 5 ते 7 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. विश्वास न बसण्यासारखी ही गोष्ट असली तरी हे खरं आहे.
- Asia’s Richest Village
माधापर गावाच्या आर्थिक भरभराटीचे प्रमुख कारण म्हणजे गावाशी निगडीत अनिवासी भारतीय. ही कुटुंबे विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये राहणारे गुजराती समुदाय आहेत. जी दरवर्षी गावामधील बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये कोट्यवधी रुपये जमा करतात. याशिवाय गावातील अनेक मुळ रहिवासी नागरिक यूके, ऑस्ट्रेलिया, यूएसए आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्येही राहतात.
कमाईचा मोठा हिस्सा गावाच्या विकासासाठी
हे लोक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाले असले तरी ते आपल्या मुळाशी म्हणजेच आपल्या गावाशी जोडलेले आहेत आणि आपल्या कमाईचा मोठा हिस्सा ते आपल्या गावाच्या विकासासाठी गुंतवतात. गावाच्या याच समृद्धीमुळे येथे अनेक बँकांच्या शाखा सुरू झाल्या आहेत.
- Asia’s Richest Village
गावात एचडीएफसी बँक, एसबीआय, पीएनबी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि युनियन बँक यासारख्या प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह एकूण 17 बँकांच्या शाखा आहेत. एखाद्या गावात बँकांच्या इतक्या शाखा असणे म्हणजे नवलं वाटण्यासारखेच आहे. एवढच नाही तर इतर बँकांनाही आपल्या शाखा या गावात उघडण्याची इच्छा आहे.
गाव सर्व मूलभूत सुविधांनी संपन्न
माधापर गावात पाणी, स्वच्छता, रस्ते, बंगले, शाळा, तलाव, मंदिरे अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या गावात सुमारे 20,000 घरे आहेत, त्यापैकी सुमारे 1200 कुटुंबे परदेशात राहतात. परदेशातून सातत्याने येणाऱ्या निधीमुळे गावाच्या अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे.
- Asia’s Richest Village
गुजरात हे व्यापार आणि उद्योगात आघाडीचे राज्य आहे, परंतु त्याची समृद्धी केवळ शहरी भागापुरती मर्यादित नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे ‘माधापर गाव’. हे गाव केवळ आर्थिकच नाही तर पायाभूत सुविधांच्या बाबतीतही खूप विकसित आहे. माधापरचे लोक परदेशात राहात असले त्यांच्या गावाला मात्र ते विसरले नाही. म्हणूनच आज हे गावं भारतातील नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनलं आहे.