मध्यप्रदेशच्या आयएएस अधिकारी Shailbala martin लवकर लग्नगाठ बांधणार, वयाच्या 56 व्या वर्षी घेणार ‘सात फेरे’

वरिष्ठ आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या 2009 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. 57 वर्षीय पत्रकार डॉ. राकेश पाठक यांच्याशी त्या विवाहबद्ध होत आहेत.

मध्यप्रदेशच्या आयएएस अधिकारी Shailbala martin लवकर लग्नगाठ बांधणार, वयाच्या 56 व्या वर्षी घेणार 'सात फेरे'
शैलबाला मार्टिन, डॉ. राकेश पाठक
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 2:29 PM

मुंबई : सध्या आयएएस टीना डाबी (Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradip Gavande) या दोघांच्या प्रेमाची आणि त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. अश्यातच आता आणखी एक आयएएस अधिकारी लग्नबंधनात अडकणार आहे. मध्य प्रदेशच्या आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (Shailabala Martin) या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या आहेत. त्या पत्रकार डॉ. राकेश पाठक (Dr. Rakesh Pathak) यांच्यासोबत लग्न करणार आहेत. याची माहिती स्वत: राकेश यांनीच दिली आहे. राकेश आणि शैलबाला दोघे मागच्या दोन वर्षआंपासून चांगले मित्र आहेत. “मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला. आम्हाला लक्षात आलं की आम्ही चांगले मित्र आहोत, सोबतच जीवनसाथी व्हायलाही काही हरकत नाही. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला”, असं राकेश यांनी सांगितलं आहे.

शैलबाला मार्टिन आणि राकेश पाठक लग्नगाठ बांधणार

वरिष्ठ आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या 2009 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. 57 वर्षीय पत्रकार डॉ. राकेश पाठक यांच्याशी त्या विवाहबद्ध होत आहेत. राकेश पाठक यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना दोन मुलीही आहेत. दोघांच्याही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न होत आहे. स्वत: राकेश पाठक यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शैलबाला मार्टिन कोण आहेत?

शैलबाला मार्टिन या 2009 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. शैलबाला या मूळच्या इंदौरच्या आहेत. त्या सध्या मध्यप्रदेश मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. शैलबाला यांना मध्यप्रदेश सरकारमध्ये अनेक पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. आताही त्या मध्यप्रदेश सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. 56 वर्षीय शैलबाला मार्टिन अजूनही अविवाहित आहेत.

राकेश पाठक कोण आहेत?

राकेश पाठक हे प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी पूर्व नवभारत,नईदुनिया,नवप्रभात,प्रदेश टुडे,datelineindia, DNN चैनल या संस्थांसोबत त्यांनी काम केलं आहे. आता ते कर्मवीर या वृत्त संस्थेचे संपादक म्हणून काम करत आहेत. राकेश यांचे हे दुसरे लग्न आहे. राकेश पाठक यांच्या पहिल्या पत्नीचे ब्लड कॅन्सरने 2015 मध्ये निधन झाले. आता ते शैलबाला यांच्याशी लग्नगाठ बांधत आहेत.

वरिष्ठ आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन वर्षांपूर्वी हे दोघे एका टीव्ही शोदरम्यान भेटले होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. संवाद सुरू झाला. यानंतर दोघांचे विचार जुळू लागले. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही लवकरच विविहबद्ध होत आहेत.

संबंधित बातम्या

Viral Video : स्वच्छ आकाश… निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे ‘तीर’, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! ‘या मुस्तफा’ गाण्याचं मुंबई पोलीस बँडच्या वतीने सादरीकरण

Video : आता तर हद्दच झाली! नूडल्सची हेअरस्टाईल, हटके केस खाण्यासाठी दोन मुलींची घाई, व्हीडिओ एकदा बघाच…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.