Magic pencil मिळाल्यावर काय करतो हा मुलगा? पाहा Interesting viral video

Magic pencil video : अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होतात, ज्यातून काहीतरी चांगला संदेश (Message) दिला जातो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ आहे, जादुच्या पेन्सिलचा.

Magic pencil मिळाल्यावर काय करतो हा मुलगा? पाहा Interesting viral video
magic pencil मिळाल्यावर काहीतरी चांगलं करण्याचा देण्यात आला मेसेजImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 8:30 AM

Magic pencil video : कधीकधी आपण कल्पनाविश्वात रमून जात असतो. एखाद्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि सुदैवानं तसंच होतं. कधीकधी मात्र आपल्या मनासारखं होत नाही. लहानपणी आपण जादुच्या अशा अनेक कथा वाचल्या, ऐकल्या. जरी त्या खऱ्या नसल्या तरी त्यातली कल्पना आणि त्या जादुचा चांगल्या कामासाठी वापर हे सर्वांसाठी एक भल्याचं काम होय. आता आपण इंटरनेटच्या जगात राहत असलो तरी असे अनेक मनोरंजक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होतात, ज्यातून काहीतरी चांगला संदेश (Message) दिला जातो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ आहे, जादुच्या पेन्सिलचा. होय. एका मुलाला जादुची पेन्सिल मिळते. मग त्याला खूप आनंद होतो. तो या जादुच्या पेन्सिलचं काय करतो, ते या व्हिडिओमध्ये दाखवलंय.

मिळते मॅजिक पेन्सिल

एक मुलगा गार्डनमध्ये फिरत असतो. तेव्हा त्याला मॅजिक पेन्सिल मिळते. तो आजूबाजूला पाहतो, पण कोणीही नसतं. मग तो ती पेन्सिल आपल्याकडेच ठेवतो. ही पेन्सिल मिळाल्यानं त्याला खूप आनंद होतो. तो घरी जाऊन त्या पेन्सिलनं लिहितो. मग त्यातून चॉकलेट, बिस्किटं, वेफर्स अशा मजेशीर गोष्टी बाहेर येतात. त्याला यातून एक चांगली कल्पना सुचते. या पेन्सिलनं दुनियेचं भलं करायचं तो ठरवतो आणि त्याप्रमाणं त्यात त्याला यशही येतं. पाहणाऱ्यांनाही तो असंच अपील करतो.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मोहक मीट (Mohak Meet) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. काही तासांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 2.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होतेय. ‘If You Get Magic Pencil जादुई पेंसिल – Magical‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन व्हिडिओ केल्यानं यूझर्सनाही तो आवडलाय. यावर ते भरभरून कमेंट्स करत आहेत. (Video courtesy – Mohak Meet)

आणखी वाचा :

इथून निघून जा नाहीतर…; चिमुरडीचा रुद्रावतार! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Video होतोय Viral

IPS अधिकाऱ्यानं Video share करत म्हटलं जीवन अमूल्य, ही पृथ्वी सर्वांची; यूझर्स म्हणतायत, मग डासांचं काय करायचं?

Viral video : पुराना है यह..! ‘या’ चिमुरडीचे जबरजस्त Stunt आणि Flip पाहून तुम्हीही हेच म्हणाल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.