VIDEO | हिंदी गाण्यावर लावणीचा ठसका, पाहा चिमुकल्या किंजलचा भन्नाट डान्स व्हिडीओ
किंजलने सोनी वाहिनीवरील 'सुपर डान्सर चाप्टर-2'मध्येही किंजलने भाग घेतला होता (Kinjal Shelkars Dance On Nora Fatehi Song).
नागपूर : सोशल मीडियावर दररोज कुठला ना कुठला व्हिडीओ व्हायरल होत असतो (Kinjal Shelkar). सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्यात दडलेलं टॅलेंट जगासमोर दाखवण्याची संधी मिळत आहे. तसेच, अनेक कलाकारांनाही या सोशल मीडियाचा खूप फायदा होतो आहे. त्याशिवाय, अनेकदा लहान लहान मुलांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. कोणाचा गोंडसपणा, कोणाची बोलण्याची पद्धत, कुणाचं गाणं तर कुणाचं रडणंही सोशल मीडियाच्या जगात व्हायरल होतो. असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर लोकांच्या पसंतीस पडतो आहे (Maharashtra News 10 Year Old Kinjal Shelkars Dance On Nora Fatehi Song Ek Toh Kum Zindagani).
नागपुरातील किंजल शेळकर, असं या 10 वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे. ती एक डान्सर आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून ती डान्स शिकते. सध्या फेसबुकवरील तिच्या डान्सचा एक व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. यामध्ये किंजल नोरा फतेहीच्या ‘एक तो कम जिंदगानी’ या गाण्यावर लावणीचा ठेका धरताना दिसत आहे. यामध्ये तिने लावणीसोबतच काही वेस्टर्न डान्सचा तडकाही लावला आहे.
किंजलला अशा प्रकारे लावणी सादर करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का नक्कीच बसला असेल. अवघ्या 10 वर्षांची चिमुकली इतक्या प्रभावीपणे लावणी करताना पाहून अनेकांची दातखिळही बसली असेल. लावणी करताना किंजल जे एक्सप्रेशन्स देते ते भल्याभल्यांना न जमण्यासारखे आहेत.
पाहा तिचा हा खास व्हिडीओ –
सोनी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर चाप्टर-2’मध्येही किंजलने भाग घेतला होता. तिथे ती स्टुडिओ राऊंडपर्यंत पोहोचली होती. किंजलच्या अदा पाहून खुद्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी आवाक झाली होती. तिने तिच्या अदांचं तसंच किंजलच्या डान्सचं कौतुकही केलं होतं. तसेच, कोरिओग्राफर गीता कपूरनेही तिच्या एक्सप्रेशन्सचं कौतुक केलं होतं.
किंजल नागपुरात राहाते. ती सध्या नागपुरातील भवन्स शाळेत वर्ग पाचवीत शिकते आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती डान्स शिकते आहे. तिने अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे.
सुपर डान्सरमधील किंजलचा परफॉर्मन्स
Maharashtra News 10 Year Old Kinjal Shelkars Dance On Nora Fatehi Song Ek Toh Kum Zindagani
संबंधित बातम्या :
डफलीच्या साथीला एकतारीची धून, व्हायरल व्हिडीओने पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, मोदी म्हणतात…
वरुण धवनच्या ‘Jaaneman Aah’ गाण्यावर अमेरिकन मॉडेलचा डान्स, व्हिडीओची सोशल मीडियावर धूम