VIDEO | तुम्हीचं सांगा कोण भारी, गाणारा की संगीत देणारा, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला शाळेतील आठवण होईल
व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक सुध्दा केलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज असंख्य व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात, त्यापैकी काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ कॉमेडीवाले असतात. लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना पाहायला आवडतात. त्याचबरोबर त्यांचं कौतुक सुध्दा अनेक लोकं करीत असतात. सोशल मीडियावर आतापर्यत लहान मुलांचे गाणे गात असतानाचे खूप व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसाच एका शाळेतील (student viral video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुलाने सुंदर आवाजात गाणं म्हटलं आहे, तर एकाने त्याला संगीत दिलं आहे.
प्रत्येकाच्या शाळेत एकजण तरी असा असतो की, तो बॅंच एकदम जोरात वाजवतो आणि बाकीची मुलं गाणी म्हणतात किंवा नाचतात. मुळात ग्रामीण भागात असं चित्र पाहायला मिळतं. परंतु आता हे चित्र शहरात सुद्धा पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
एका विद्यार्थ्यांने शाळेच्या गणवेशात सुंदर आवाज फॅंड्री चित्रपटातील गाणं गायलं आहे. “तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला” असं त्या गाण्याचे बोल आहेत. विशेष म्हणजे त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने बॅंच वाजवून चांगलं संगीत दिलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक सुध्दा केलं आहे.