Video : महाराष्ट्रातल्या शेकडो महिलांची एकच तक्रार ‘नवरा हरवलाय!’, नेमकी भानगड काय आहे?
Viral video : सध्या सोशल मीडियावर काही व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात त्या महिला आपला नवरा हरवल्याची तक्रार करत आहेत.
मुंबई : लग्न माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय. लग्नानंतर आयुष्य बदलल्याचं अनेकजण सांगतात. लग्नानंतर आयु्ष्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. नवरा बायको एकमेकांना टोमणे मारतानाही दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच गोष्टी व्हायरल (Viral video) होत आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) शेकडो महिलांची एकच तक्रार आहे की माझा नवरा हरवलाय… आता ही भानगड नेमकी काय आहे? जाणून घेऊयात…
व्हायरल व्हीडिओ
सध्या सोशल मीडियावर काही व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात त्या महिला आपला नवरा हरवल्याची तक्रार करत आहेत.
नवरा हरवल्याची तक्रार
सध्या सोशल मीडियावर काही व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात महिलांनी नवरा हरवल्याची तक्रार केली आहे. इन्स्टाग्रामवरच रील चर्चेचा विषय ठरतात. असेच रील्स सध्या पाहायला मिळत आहेत. यात या महिला साहेब माझा नवरा हरवलाय, असं म्हणतात. त्यावर समोरून पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करा हे पोस्ट ऑफिस आहे, असं सांगण्यात येतं. त्यावर ती महिला होय काय? आनंदाच्या भरात कुठे जावं कळतंच नाही, असं म्हणते. या ऑडिओवर सध्या अनेकांनी रील्स बनवलेत. या ऑडिओच्या रील्सला मोठ्या प्रमाणावर पसंत केलं जातंय.
View this post on Instagram
सायली पवार या तरूणीने हा व्हीडिओ सर्वप्रथम बनवला. त्याला साडे पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच 56 हजारांहून अधिकांनी लाईक केलं आहे. तर यावर खूप साऱ्या लोकांनी कमेंट केल्या आहेत. यात हसण्याच्या इमोजी सर्वाधिक पाहायला मिळत आहेत. याला तिने “आनंदाच्या भरात कुठं जाऊ तेच कळेना…”, असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
सायली पवार या तरूणीच्या ओरिजन आवाजातील हे रील खूप व्हायरल झालं त्या ऑडिओवर अनेकांनी रील्स बनवलेत. या रील्सवर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram