Video : प्री वेडिंग शुटवेळी मुलीच्या मांडीवर धामण, नवरदेवाने… अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

| Updated on: Dec 21, 2023 | 10:34 PM

Viral Reel : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. प्री वेडिंग वेळी कपलच्या मध्येच साप आल्याने मोठी खळबळ उडालेली दिसत आहे. दोघांच्या मध्या साप आल्यावर पाहा काय घडलं?

Video : प्री वेडिंग शुटवेळी मुलीच्या मांडीवर धामण, नवरदेवाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
Follow us on

मुंबई :  प्री-वेडिंग फोटो शूटचा ट्रेंड आता चांगलाच वाढला आहे. शूट करण्याचं लोकेशन निवडण्यासाठी कपल्स अनेक ठिकाणी चौकशी करतात. काही फोटोशूट तर चर्चेत येतात, कारण काहीजण जंगलात तर काही नदीकाठी करतात. समुद्र किनारी किंवाा बागेत आता कॉमन झालं आहे. वेगळं आणि थ्रिल म्हणून नवीन ठिकाणी प्री-वेडिंग करतात. अशातच एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघे पाण्यात बसलेले असताना दोघांच्या मधून साप जातो. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये कपल प्री वेडिंग फोटो शूट करत होते. कॅमेरामन भावी नवरदेवाला अरे इकडे बग तिकडे का पाहत आहेस असं विचारतो. मुलगीही त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र तो काही पाहत नाही कारण त्या मुलाचं लक्ष सापाकडे असतं. त्याला दिसत होतं की साप त्यांच्याकडे येत आहे. मात्र प्रसंगावधान राखत कोणताही आरडा ओरडा तो करत नाही.

पाहा व्हिडीओ-

 

साप आलेला दिसल्यावर त्याने सर्वांना संयम राखायला लावला. सगळेजण तपणे उभे राहिले आणि सापाला शोधू लागले. काही वेळातच साप दाम्पत्याजवळून गेला आणि कॅमेरामनजवळ पोहोचला. रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्येही साप सहज दिसतो. कॅमेरामनच्या दिशेने आल्यानंतर साप अचानक मागे वळून मुलीच्या दिशेने गेला. साप दोघांच्य अंगावरून गेला आणि दुसऱ्या बाजूला पाण्याकडे निघून गेला.

दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टावर भरपूर व्हायरल झाला आहे. सर्वांनी कोणत्याही ठिकाणी शूट करण्याआधी काळजी घ्यायला हवी. त्या जागेची पाहणी करून घ्यावी नाहीतर प्री-वेंडिंग अंगलट येवू शकतं.