VIDEO | या तरुणाच्या तबल्यावर शिवतांडव ऐकून आनंद महिंद्रा देखील मंत्रमुग्ध

| Updated on: Feb 18, 2023 | 11:53 PM

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. असाच एक शिव तांडव स्तोत्राचा व्हीडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

VIDEO | या तरुणाच्या तबल्यावर शिवतांडव ऐकून आनंद महिंद्रा देखील मंत्रमुग्ध
Follow us on

मुंबई : राज्यासह देशभरात आज (18 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळतोय. महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्वच शिव मंदिरं गर्दीने फुलून गेली. भाविकांनी मंदिरामंध्ये एकच गर्दी केली. महशिवरात्री निमित्ताने अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. ओम नःम शिवाय, शिव हर शंकर, नमामी शंकरच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात दुग्धाभिषेक, महापूजा करण्यात आली. दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

हा तरुण तबल्यावर अफलातून शिव तांडव स्तोत्र वाजवतोय. हा व्हीडिओ वांरवार ऐकावा वाटतोय. ‘तबला गाय’ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. महिंद्रा एन्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे देखील या तरुणाच्या व्हीडिओच्या प्रेमात पडले. महिंद्रा यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे.

हे सुद्धा वाचा

तबलागाय निखिल परळीकर

तबल्याच्या साथीने शिव तांडव स्तोत्र वाजवणारा हा तरुण मराठी आहे. या तरुणाचं नाव निखिल परळीकर असं आहे. निखिलने हा व्हीडिओ 3 वर्षांपूर्वी बनवला होता. मात्र आताही हा व्हीडिओ तितकाच पाहिला जात आहे. निखिलने हा व्हीडिओ त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन अवघ्या काही तासांपूर्वी शेअर केला आहे. या व्हीडिओला 7 हजारपेक्षा अधिक जणांनी लाईक केलं आहे.

आनंद महिंद्रा मंत्रमुग्ध

निखिलने तबल्यावर दाखवलेली कलाकारी आनंद महिंद्रा यांनाही भावली. आनंद महिंद्रा हा व्हीडिओ शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

आनंद महिंद्रा यांच्याकडुून व्हीडिओ शेअर

आनंद महिंद्रा यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओला आतापर्यंत 24 हजार जणांनी लाईक केलंय. तर 3 हजारपेक्षा अधिक जणांनी हा व्हीडिओ रिट्विट केला आहे.