Real Bahubali : कोणाला जमलं नाही ते यानं ‘करून दाखवलं’; लोक म्हणाले, हाच खरा ‘बाहुबली’, Video viral

Mahout climbs on an elephant : 'बाहुबली 2'चे (Bahubali) ते लोकप्रिय दृश्य आठवा, ज्यामध्ये दक्षिण भारतीय अभिनेता प्रभास (Prabhas) हत्तीला (Elephant) नियंत्रित करतो आणि त्याच्या सोंडेवर उभा असतो.

Real Bahubali : कोणाला जमलं नाही ते यानं 'करून दाखवलं'; लोक म्हणाले, हाच खरा 'बाहुबली', Video viral
बाहुबली स्टाइलमध्ये हत्तीवर चढतो माहूतImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 10:31 AM

Mahout climbs on an elephant : ‘बाहुबली 2’चे (Bahubali) ते लोकप्रिय दृश्य आठवा, ज्यामध्ये दक्षिण भारतीय अभिनेता प्रभास (Prabhas) हत्तीला (Elephant) नियंत्रित करतो आणि त्याच्या सोंडेवर उभा असतो. त्या क्षणांपैकी हा एक क्षण होता जो खूप लोकप्रिय झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी दृश्य पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सपशेल अपयशी ठरले. मात्र, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माहूत बाहुबली स्टाइलमध्ये हत्तीवर चढताना आणि स्वार होताना दिसत आहे, ज्याला पाहून लोक थक्क झाले. व्हिडिओमध्ये एक हत्ती रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. बाहुबली स्टाइलमध्ये एक म्हातारा माहूत आधी हत्तीच्या सोंडेवर आणि नंतर त्याच्या पाठीवर चढतो. हत्तीदेखील त्याला वर चढण्यास मदत करण्यासाठी आपली सोंड खाली करतो, त्यानंतर तो स्वार होतो.

ट्विटरवर पोस्ट

व्हिडिओ पाहून समजू शकते, की दोघांमध्ये किती सुंदर नाते आहे. एकमेकांवर त्यांचा किती विश्वास आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘#Baahubali2मध्ये @PrabhasRajuने केले तसे त्याने केले.’ त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राजामौली आणि बाहुबली चित्रपटालाही टॅग केले.

‘हे नाते पाहणे आनंददायी’

व्हिडिओ पाहून यूझर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 31,000हून अधिक व्ह्यूज आणि 400हून अधिक रिट्विट्ससह हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला. काहींनी त्याला ‘खरा बाहुबली’ म्हटले तर इतर यूझर्स व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले. एका यूझरने लिहिले, ‘मानव-प्राणी संघर्षाच्या बातम्यांदरम्यान, हे खोल मानव-प्राणी यांच्यातले नाते पाहणे खूप आनंददायी आहे, कदाचित परस्पर विश्वास आणि प्रेमाने वर्षानुवर्षे ते बांधले गेले आहे.’ दुसर्‍याने लिहिले, की त्या व्यक्तीने प्रभाससारखे केले.

आणखी वाचा :

दिल जीत लिया! परदेशातली पोरं भारतीय गाण्यावर कशी थिरकतायत? पाहा Viral video

Hyena video viral : एखादी मांजर असल्यासारखं तरसासोबत खेळतोय; लोक म्हणतायत, भीती कशी नाही वाटत?

समुद्रात पोहत होती, तेवढ्यात कानात घुसला जिवंत खेकडा! Video viral

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.