Viral Video: मैं हूं डॉन गाणे ऐकताच काँग्रेस आमदार मंचावर, हातात बंदुक, मग त्यांनी काय केलं पाहा व्हिडीओत
Viral Video: मैं हूं डॉन गाणे सुरु, हातात बंदुक असलेले कॉंग्रेस आमदार स्टेजवर पोहचले, मग सगळ्यांना घाम फुटला
मध्यप्रदेश : सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यामध्ये काही चांगले तर काही मजेशीर व्हिडीओ असतात. सध्या नवीन वर्षाचे स्वागत कसे केले, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनेकांनी वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचा संकल्प केला असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु कॉंग्रेसच्या एका आमदारांचा (Congress MLA) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये बंदुक दिसत आहे.
मध्यप्रदेशातील आमदार सुनील सराफ यांच्या विरोधात कोतमा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आणि आमदार सुनील सराफ यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे एका ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं स्पिकरवरती गाणी सुरु होती. त्यावेळी आमदारांची काही खास मंडळी सुध्दा तिथं डान्स करीत असल्याची व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
ज्यावेळी मंचावर मैं हूं डॉन… हे गाणं सुरु होतं. त्यावेळी आमदार सुनील सराफ मंचावर जातात. तिथल्या लोकांसोबत डान्स करु लागलात. त्याचवेळी त्यांच्याकडे असलेली बंदुक काढतात आणि हवेत गोळीबार करतात त्याचा व्हिडीओ तिथल्या एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
MP: कांग्रेस विधायक सुनील सराफ ने की हर्ष फायरिंग
‘मैं हूं डॉन’ गाना बजते ही जोश में आए MLA, जन्मदिन की पार्टी में चला दी गोली
इसका वीडियो बनाकर किसी ने सोशल मीडिया में वायरल कर दिया pic.twitter.com/ZAmg2TddLl
— Privesh Pandey (@priveshpandey) January 2, 2023
तो व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की, पोलिसांनी त्या व्हिडीओची पाहणी केल्यानंतर आमदार सुनील सराफ यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याची तक्रार राज्यातील गृहमंत्र्यांकडे दाखल झाली होती. आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इसमाचं नाव भुनेश्वर शुक्ला नावं आहे. पोलिस त्या व्हिडीओची अधिक चौकशी करीत आहेत.