Viral video : ‘असा’ Workout पाहिलाय का कधी? Guinness World Recordनंही घेतली नोंद
Pull ups from a helicopter : आर्मेनियामध्ये (Armenia) राहणाऱ्या रोमन सहराद्यानचा (Roman Sahradyan) आहे. ज्याने एका मिनिटात उडत्या हेलिकॉप्टरला लटकून 23 पुल-अप केले. यानंतर त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंदवले गेले.
Pull ups from a helicopter : वर्कआउट करून सुडौल शरीर मिळवण्यासाठी खूप मेहनत लागते. संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात, परंतु तुम्ही हेलिकॉप्टरला लटकून वर्कआउट करताना कोणी पाहिले आहे का? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक माणूस उडत्या हेलिकॉप्टरमध्ये लटकून वर्कआउट करताना दिसला. हे पाहून जगभरातील लोकांना आश्चर्य वाटले. व्हायरल व्हिडिओमध्ये हा माणूस हेलिकॉप्टरला लटकताना आणि हवेत पुल-अप करताना दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ स्वतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आर्मेनियामध्ये (Armenia) राहणाऱ्या रोमन सहराद्यानचा (Roman Sahradyan) आहे. ज्याने एका मिनिटात उडत्या हेलिकॉप्टरला लटकून 23 पुल-अप केले. यानंतर त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंदवले गेले.
इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रोमन हेलिकॉप्टरची लँडिंग स्लाइड पकडताना लटकताना दिसत आहे. यानंतर हेलिकॉप्टर टेक ऑफ होतो आणि रोमन हवेत लटकतो. यानंतर, तो हवेत उडणाऱ्या हेलिकॉप्टरला लटकून अतिशय कुशलतेने पुल-अप करतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रोमनच्या उत्साहाचे कौतुक
हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की हेलिकॉप्टरमधून रोमन सहराद्यानद्वारे एका मिनिटात सर्वाधिक पुल अप्स… हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की त्याला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोक खूप कमेंट करत आहेत. बहुतेक लोक रोमनच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत. रोमनने मागच्या वर्षी 2 ऑक्टोबरला आर्मेनियाच्या येरेवनमध्ये हा विक्रम केला होता.
View this post on Instagram