पाण्याखाली सापडलं तब्बल 1200 वर्ष जुनं शहर! काय केला वास्तूविशारदानं दावा? वाचा सविस्तर
Underwater old ancient city : एका माजी वास्तुविशारदाने (Architect) 1200 वर्षे जुने शहर पाण्याखाली सापडल्याचा दावा केला आहे. क्रॅकपॉट जॉर्ज गेले (Crackpot George Gelé) या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव आहे.
Underwater old ancient city : एका माजी वास्तुविशारदाने (Architect) 1200 वर्षे जुने शहर पाण्याखाली सापडल्याचा दावा केला आहे. क्रॅकपॉट जॉर्ज गेले (Crackpot George Gelé) या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव आहे. मेक्सिकोच्या (Mexico) आखातातील चांडलूर बेटांवर पाण्याखालील प्राचीन शहराचे अवशेष सापडल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. गेले सांगतात, की त्यांना पाण्याच्या खोलीतून सापडलेले दगड हे प्राचीन शहरात बांधलेल्या इमारतींचे अवशेष आहेत, असे वाटते. जॉर्ज गेले यांनीही प्राचीन शहराच्या अवशेषांसह पिरॅमिड सापडल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले, की 12,000 वर्ष जुन्या शहराचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी त्यांनी 44 वेळा भेट दिली होती. दरम्यान, 1200 वर्षे जुने शहर शोधण्याच्या त्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांना मात्र फारसा विश्वास नाही.
मिसिसिपी नदीच्या खाली दगड टाकले आणि…
पाण्यात सापडलेल्या या ग्रॅनाइट शहराच्या मध्यभागी एक पिरॅमिडही असल्याचा दावा माजी वास्तुविशारद गेले यांनी केला आहे. त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूएल-टीव्हीला सांगितले, की येथे शेकडो इमारती आहेत, ज्या वाळू आणि गाळाने झाकलेल्या आहेत. त्या गिझाच्या ग्रेट पिरॅमिडशी संबंधित आहेत. गेले यांच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी मिसिसिपी नदीच्या खाली एक अब्ज दगड टाकले आणि ते बाहेर गोळा केले, ज्याचे नंतर न्यू ऑर्लीन्स बनले.”
50 वर्षांपासून सुरूय अभ्यास
‘डेली स्टार’नुसार, गेले जवळपास 50 वर्षांपासून ‘मोठ्या इमारतींचे अवशेष’ आणि ‘महान पिरॅमिड्स’चा अभ्यास करत आहेत. अलीकडे, जेव्हा ते व्होलनाव येथून समुद्रात गेले तेव्हा त्यांना कथितरित्या 1200 वर्षे जुने ग्रॅनाइट शहर सापडले. त्यांनी ज्या जागेवर शहर मिळवल्याचा दावा केला, तो याआधीही स्थानिक चर्चेचा विषय ठरला आहे. कारण येथील मच्छिमार अनेकवेळा विचित्र खडक आपल्या जाळ्यात अडकल्याची माहिती देत असतात.
त्यांच्या सिद्धांतांवर तज्ज्ञांची शंका
पाण्यात एवढी जाड आणि घनदाट ग्रॅनाइटची रचना कोण बांधू शकेल, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या पिरॅमिडल रचनेची उत्पत्ती, वय आणि उद्देश याबद्दल गेले यांचे मनोरंजक सिद्धांत आहेत. त्यांच्या सिद्धांतांवर तज्ज्ञ शंका घेतात.