Video | भरधाव वेगाने घेतला जीव, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे

सध्या एका भयानक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (telangana man dodges check post died)

Video | भरधाव वेगाने घेतला जीव, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:05 PM

मुंबई : प्रवास करताना दुर्घटना होण्यापेक्षा उशीर झालेला कधीही चांगला असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, या साध्या नियमाचे अनेकांकडून पालन केले जात नाही. घाई, गडबडीमध्ये अनेकवेळा मोठ्या दुर्घटना घडतात. सध्या अशाच एका भयानक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला आहे. (man died on check post of Telangana after dodges check post video goes viral)

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून थांबण्याचे आवाहन

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ तेलंगाना राज्यातील आहे. तेलंगाना येथील थापलापूर गावात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये थापलापूर येथील वन विभागाचे चेकपोस्ट दिसत आहे. वन विभागाचे अधिकारी या चेकपोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत. त्यासाठी या अधिकाऱ्यांकडून वाहनांना थांबवण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये वन विभागाचा कर्मचारी समोरुन येत असलेल्या दोन दुचाकीस्वारांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तो हात दाखवत या दुचाकीस्वारांना थांबण्याचे सांगतोय. मात्र, दुचाकीस्वार वेगात गाडी चालवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.

नियम धुडकावल्यामुळे गंभीर अपघात

व्हिडीओमध्ये दोन दुचाकीस्वार मोठ्या वेगामध्ये दुचाकी चालवताना दिसतायत. कर्मचारी थांबण्याचे सांगत असला तरी व्हिडीओतील दुचाकीस्वार चेकपोस्टकडे वेगात येत असल्याचे दिसतेय. याच कारणामुळे वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. दुचाकी चालवत असताना चेकपोस्टवरील बॅरिकेड मध्ये आल्यामुळे दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा थेट मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या माणसाच्या डोक्यात बॅरिकेट जोरात लागले आहे.

पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ :

अपघातात एकाचा मृत्यू

हा अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या माणसाला बॅरिकेट लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर मागे बसलेला व्यक्ती दुचाकीवरुन पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे. तेलंगाना टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार मृत्यू झालेली व्यक्ती ही तीस वर्षांची असून त्याचे नाव सुदावेनी व्यंकटेश गौड़ असे आहे. मृत व्यक्ती कोठागुडेम गावातील रहिवाशी आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे, याचेसुद्धा महत्त्व नेटकरी या निमित्ताने सांगत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

Video | गाढव-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(man died on check post of Telangana after dodges check post video goes viral)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.