घटस्फोट घेऊन आनंद साजरा करायला गेला; दोरी तुटली आणि…

| Updated on: May 09, 2023 | 8:08 PM

आता पूर्वीसारखी मला झोप येत नाही. झोपेसाठी कुणाच्या ना कुणाची मदत घ्यावी लागते. अपघात झाल्यापासून आता झोप लागली तरी मला भयानक स्वप्न पडतात, आणि त्याचीही मला प्रचंड भीती वाटू लागते.

घटस्फोट घेऊन आनंद साजरा करायला गेला; दोरी तुटली आणि...
Follow us on

मुंबई : आपला घटस्फोट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी परदेशात सध्या वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबविल्या जात आहे. त्यातील एक म्हणजे बंजी जंपिंग. आपल्या घटस्फोटाचा आनंद साजरा करण्यासाठी एका व्यक्तीने बंजी जंपिंगला गेला होता, मात्र दुर्देवाने त्याचवेळी दोरी तुटली आणि तो थेट 70 फूट पाण्यात पडला. एवढ्या उंचीवरून तो खाली पडल्यामुळे त्यांच्या मानेला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अजूनही त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. बंजी जंपिंगला गेलेल्या बावीस वर्षीय युवकाचं नाव आहे, राफेल डॉस सँटोस टोस्टा.

त्याने 11 फेब्रुवारी रोजी ब्राझीलमधील कॅम्पो मॅग्रो येथे या अद्भूत साहसाचा अनुभव घेण्यासाठी गेला होता.मात्र ज्या आनंदासाठी तो गेला होता, त्या आनंदावर त्याची दोरी तुटल्यामुळे या साऱ्या आनंदावर पाणी फेरले आहे.

त्यामुळे तो आता गंभीर जखमीही आहे. हा तरुण ब्राझीलमधील अरौकारिया भागातील एका कारखान्यात प्रॉडक्शन ऑपरेटर म्हणून काम करणारा आहे. त्यामुळे आता या अपघातामुळे तो आता कामापासूनही लांब गेला आहे.

हा अपघात झाल्यानंतर त्याला अनेकांनी झालेल्या अपघाताबद्दल प्रश्न विचारले, त्यावर तो म्हणाला की, मुळात मी खूप शांत आहे. मात्र आता थोडी माझी परिस्थिती बदलली आहे.

तो म्हणाला की, त्या दिवशी मी खरच आनंदी आणि उत्साहीही होतो. त्यामुळे माझ्या घटस्फोटानंतर मला माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा होता.

आयुष्यात मी अनेक बऱ्या वाईट गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे जीवनाविषयी मला खूप काही वाटत होतं असं नाही. ज्या अपघातातू मी वाचलो आहे, ते आठवल्यानंतर मात्र मला थोडं आता चमत्कारिक वाटत आहे.

या अपघाताबद्दल बोलताना तो सांगतो की, मी पाण्यात पडल्यानंतर जेव्हा मी उभा राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र मला प्रचंड वेदना झाल्या होत्या. त्या वेदना याआधीच आयुष्यात मला कधीच जाणवल्या नव्हत्या, मात्र त्या वेदना भयानक होत्या असंही त्यांनी ती आठवण सांगितली.

आपल्या झालेल्या अपघातानंतर तो सांगतो की, एवढ्या धोकादायक अपघातातून वाचल्यावर आणि आपण जिवंत राहिलो आहोत या गोष्टीचाच आनंद खूप आहे. जीवन परत मिळाल्याचा आनंद मिळाला आहे खरा मात्र माझ्या आयुष्यातील सगळी झोपच आता निघून गेल्याचेही त्याने सांगितले.

या अपघातानंतर राफेल सांगतो की, आपलं आयुष्य जगण्यासाठी आणि नवं आयुष्य पाहण्यासाठी जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ राहिले पाहिजे.

मी असं माझ्या आयुष्याकडे कधी पाहिले नाही मात्र तशी काळजी कधी घेतली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या आयुष्यातील तोच तोच पणा मला नको आहे, त्यामुळे मी नेहमीच नवं काही तरी करायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आता मी जिवंत राहिलो त्याबद्दल मला आता आयुष्याचेच आभार मानायचे आहेत असंही तो सांगतो.

राफेल म्हणतो की आता पूर्वीसारखी मला झोप येत नाही. झोपेसाठी कुणाच्या ना कुणाची मदत घ्यावी लागते. अपघात झाल्यापासून आता झोप लागली तरी मला भयानक स्वप्न पडतात, आणि त्याचीही मला प्रचंड भीती वाटू लागते.

राफेलच्या अपघातानंतर आता मिलिटरी पोलीस एअर ऑपरेशन्स बटालियनच्या वैद्यकीय पथकाने त्याला सुस्थितीत आणले आहे.

त्यानंतर त्याला हेलिकॉप्टरने कॅम्पो लार्गो येथील रोसिओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून अजूनही त्याच्यावर तिथेच उपचार केले जात आहे.