असले Stunt केल्यावर दात राहतील का जागेवर? लोक म्हणतायत, जास्त सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम!
Funny stunt video : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये स्टंट करताना एका व्यक्तीला जबर दुखापत (Injury) झाली. त्याला असा काही धडा मिळाला, की पुन्हा तो असे काही करताना विचार करेल.
Funny stunt video : तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे स्टंट पाहिले असतील आणि ते पाहून तुम्हालाही असे स्टंट करावेसे वाटतील. पण शेवटी असे स्टंट कसे करायचे, हा प्रश्न आहे. त्यात खूप धोका असतो. कोणताही स्टंट करण्यात धोका असला तरी सध्या तरुणांमध्ये त्याची क्रेझ खूप वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये तरूण वेगवेगळे आणि धोकादायक स्टंट करताना दिसतात. मात्र, कधी कधी स्टंट करताना लोकांना दुखापत झालेलीही पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये स्टंट करताना एका व्यक्तीला जबर दुखापत (Injury) झाली. त्याला असा काही धडा मिळाला, की पुन्हा तो असे काही करताना विचार करेल. व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
…अन् भिंतीला जाऊन आदळला
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक माणूस दुरून छतावर धावत येतो आणि स्टंट करण्यासाठी दुसऱ्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला जिथे उडी मारायची आहे तिथे तो संतुलन राखू शकला नाही, ज्यामुळे तो दुसऱ्या छतावर पलिकडे जाण्याऐवजी मध्येच आपटतो. तो ज्या प्रकारे खाली पडला त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली असावी. त्यातल्या त्यात तो नशीबवान होता, की तो छताच्या कोपऱ्यावर पडला नाही, अन्यथा गंभीर जखमी झाला असता तसेच त्याच्या डोक्यालाही इजा झाली असती आणि त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळेच कोणताही स्टंट करताना आत्यंतिक काळजी घ्यावी लागते. कोणतीही दुर्घटना घडू नये, असे म्हटले जाते.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
हा व्हिडिओ parkour_extreme_youtube नावाने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 12 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 लाख 49 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने गंमतीत लिहिले आहे, की एकही दात उरला नसेल. तर दुसऱ्या यूझरनेही अशाच प्रकारे लिहिले आहे, की तुम्ही खूप मॅट्रिक्स (चित्रपट) पाहता तेव्हा असे होते.