काय रे देवा ! आता पाणीपुरीवरूनही वाद… भर रस्त्यात दे दणादण धुलाई; व्हिडीओही व्हायरल

लोकं कशावरून भांडतील काही नेम नाही. आता पहा ना, पाणीपुरी खायला गेलेल्या दोन तरूणांमध्ये असा वाद झाला ज्याचे थेट मारामारीतच रुपांतर झाले ना...

काय रे देवा ! आता पाणीपुरीवरूनही वाद... भर रस्त्यात दे दणादण धुलाई; व्हिडीओही व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 1:23 PM

लखनऊ | 31 ऑगस्ट 2023 : पाणीपुरी खायला आवडत नाही, अशी व्यक्ती विरळाच. जर तुम्हालाही पाणीपुरी (panipuri) आवडत असेल तर बाजारात एक प्लेटचा काय रेट आहे, तेही माहित असेलच. 10 रुपयांत किती पाणीपुरी मिळते, याचीही तुम्हाला कल्पना असेलच. पण एक दबंग युवक एवढ्याच पैशांत सात गोलगप्पे खाण्यावर अडून राहिला. मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून सर्वच हैराण झाले. पुढल्याच क्षणी दुकानदार आणि कस्टमरमध्ये भररस्त्यात फिल्मी स्टाइल हाणामारी (dispute) झाली ना ! ते दृष्य बघून सर्वांचेच डोळे विस्फारले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथे घडल्याचे समजते.

पाणीपुरीवरून झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ एकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की दोघे जण भररस्त्यात एकमेकांवर तुटून पडले असून मारहाण करत आहेत. रस्त्यावरून जाणारे येणारेही त्यांचं भांडण बघत आहेत, पण त्या दोघांना काहीत फरक पडलेला नाही. दोघेही जणू कुस्तीचा सामना सुरू असल्यासारखे भांडताना दिसत आहेत.

हाच तो व्हिडीओ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमीरपूरमध्ये रामसेवक नावाचा तरुण पाणीपुरी विकतो. १० रुपयांना ५ पुऱ्या असा त्याचा रेट आहे. मात्र गावातील एका दबंग तरुणाने त्याला सात पाणीपुऱ्या द्यायला सांगत, त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला व त्याचे रुपांतर मारामारीत झाले, जे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या व्हिडीओवर अनेक लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.